SA vs AFG Match Updates Lungi Ngidi’s left ankle injured: आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना १६ नोव्हेंबरला कोलकात्याच्या ईडन गार्डनवर खेळवला जाईल. या सामन्यापूर्वी आफ्रिकन संघाला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान संघाचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी दुखापत झाली. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामन्यादरम्यान लुंगी एनगीडीला दुखापत –

अफगाणिस्तानच्या डावातील सहावे षटक टाकताना एनगिडीला डाव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली. त्यानंतर त्याला मैदान सोडावे लागले. एनगिडीला चालताना लंगडत असल्याच दिसत होते. त्याने मैदान सोडल्यानंतर एडन मार्करामने त्याचे उर्वरित षटक पूर्ण केले. एडन मार्करामने ३ चेंडू टाकले. भारताविरुद्धच्या सामन्यात लुंगी एनगिडीलाही हाच त्रास झाला होता. त्याची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत आत्ताच काही सांगणे अवघड आहे.

उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार –

दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत पोहोचणारा भारतानंतर दुसरा संघ ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेचा उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी सामना होणार आहे. हा सामना १६ नोव्हेंबरला कोलकात्याच्या ईडन गार्डनवर खेळवला जाईल. त्याआधी अखेरच्या साखळी सामन्यात त्याचा सामना अफगाणिस्तानशी होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेने संघात दोन बदल केले आहेत.

हेही वाचा – IND vs NZ: “तुम्ही यापेक्षा चांगली…”; ट्रेंट बोल्ट उपांत्य फेरीत भारताला ‘४४० व्होल्ट’चा झटका देण्यास सज्ज

अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, राशिद खान, इकराम अलीखिल (यष्टीरक्षक), मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन उल हक

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (डब्ल्यू), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, अँडिले फेहलुकवायो, डेव्हिड मिलर, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sa vs afg match updates afghanistan have won the toss and elected to bat first against south africa vbm 97
Show comments