South Africa vs Afghanistan ICC Cricket World Cup 2023 Match Updates: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा ४२वा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान आमनेसामने आहेत. दोन्ही संघाचा हा शेवटचा साखळी सामना आहे. या सामन्यात अफगाणिस्तान संघाला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी मोठ्या फरकाने विजय आवश्यक आहे. मात्र, भारत आणि ऑस्ट्रेलियासह दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली आहे. आता अफगाणिस्तानला स्पर्धेत टिकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावे लागेल. तत्पूर्वी अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या तुलनेत अफगाणिस्तानचा नेट रन रेट खूप खराब आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या फरकाने विजय मिळावा आणि इतर सामन्यांचे निकाल अनुकूल असतील अशी आशा बाळगावी लागेल. या सामन्याचा निकाल काहीही लागला तरी अफगाणिस्तानने आपल्या शानदार कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत. अफगाणिस्तानने आठपैकी चार सामने जिंकले आहेत. आता ते आत्मविश्वासाने भरले आहेत आणि जेव्हा त्यांचा दिवस असेल तेव्हा ते कोणालाही पराभूत करू शकतात.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’

अफगाणिस्तानचा संघ उपांत्य फेरीसाठी कसा पात्र ठरेल?

अफगाणिस्तानचा सध्याचा नेट रन रेट -०.३३८ आहे, तर न्यूझीलंडने +०.७४३ च्या नेट रन रेटने साखळी फेरी पूर्ण केली. वानखेडे स्टेडियमवर भारताविरुद्धचा उपांत्य सामना खेळण्यासाठी आणि नेट रनरेटच्या बाबतीत न्यूझीलंडला मागे टाकण्यासाठी अफगाणिस्तानला दक्षिण आफ्रिकेला ४३८ धावांनी पराभूत करावे लागेल. त्याचबरोबर पाकिस्तान इंग्लंडविरुद्धचा सामना पराभूत व्हावा, अशी प्रार्थना करावी लागेल.

हेही वाचा – World Cup 2023: उपांत्य फेरीसाठी न्यूझीलंड मजबूत स्थितीत, पाकिस्तान संघासाठी काय आहे समीकरण? जाणून घ्या

अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, राशिद खान, इकराम अलीखिल (यष्टीरक्षक), मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन उल हक

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (डब्ल्यू), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, अँडिले फेहलुकवायो, डेव्हिड मिलर, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी