South Africa vs Afghanistan ICC Cricket World Cup 2023 Match Updates: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुक्रवारी एकदिवसीय विश्वचषक २०२३ या स्पर्धेतील ४२वा सामना खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेन अफगाणिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. अफगाणिस्तानने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने ५० षटकांत सर्वबाद २४४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने रॅस्सी व्हॅन डर डुसेनच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर ४७.३ षटकांत ५ गडी राखून विजय नोंदवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या साखळी सामन्यात अफगाणिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. या पराभवासह अफगाणिस्तानचा वनडे विश्वचषक २०२३ मधील प्रवास संपला. मात्र, अफगाणिस्तान संघाने या स्पर्धेत चमकदार खेळ केला. या सामन्यातही अफगाणिस्तानचा संघ संघर्षानंतर पराभूत झाला. दक्षिण आफ्रिका संघाकडून रॅसी व्हॅन डर डुसेनने नाबाद अर्धशतक झळकावले. त्याने ९५ चेंडूंत ६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ७६ धावांची खेळी खेळली. अफगाणिस्तानकडून राशिद आणि नबीने २-२ विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अजमतुल्ला उमरझाईच्या नाबाद ९७ धावांच्या खेळीच्या जोरावर ५० षटकांत सर्वबाद २४४ धावा केल्या होत्या. अजमतुल्ला उमरझाईने १०७ चेंडूत नाबाद ९७ धावा केल्या. या खेळीत त्याने सात चौकार आणि तीन षटकार मारले. रहमत शाह आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी २६ धावांचे योगदान दिले. रहमानउल्ला गुरबाजने २५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना जेराल्ड कोएत्झीने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर लुंगी एनगिडी आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. फेहलुकवायोने एक विकेट घेतली.

हेही वाचा – ICC on SLCB: श्रीलंकेला मोठा धक्का! आयसीसीने तात्काळ प्रभावाने क्रिकेट बोर्डाचे सदस्यत्व केले निलंबित

दक्षिण आफ्रिकेचा संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचे ९ सामन्यात १४ गुण झाले आहेत. मात्र, गेल्या सामन्यात भारताविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीत हा संघ पुन्हा विजयी मार्गावर परतला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेने विजय मिळवला आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी अफगाणिस्तानला हा सामना ४३८ धावांनी जिंकावा लागणार होता. अशा स्थितीत हा संघ आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sa vs afg match updates south africa beat afghanistan by 5 wickets in world cup 2023 vbm
Show comments