Australia vs South Africa World Cup 2023 Live Match Score in Marathi: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये आज दक्षिण आफ्रिकेचा सामना ऑस्ट्रेलियाशी होत आहे. आफ्रिकन संघाने पहिल्या सामन्यात श्रीलंकेवर मोठा विजय मिळवला होता. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता ऑस्ट्रेलिया विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेला विजयाची मालिका सुरू ठेवायची आहे. ऑस्ट्रेलियाने लखनऊ येथील सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन संघात दोन बदल करण्यात आले आहेत. कॅमेरून ग्रीनच्या जागी मार्कस स्टॉइनिस आणि अॅलेक्स कॅरीच्या जागी जोश इंग्लिसचा संघात समावेश करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघही एका बदलासह मैदानात उतरला आहे. कोएत्झीच्या जागी फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सीचा संघात समावेश करण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ जबरदस्त फॉर्मात –

दक्षिण आफ्रिकेचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. विश्वचषकातील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा १०२ धावांनी पराभव केला. या सामन्यात आफ्रिकेच्या फलंदाजांनी कमाल केली. क्विंटन डी कॉक, रॅसी व्हॅन डर डुसेन आणि एडन मार्कराम यांनी शतकी खेळी खेळली. मार्करामने वर्ल्ड कपमधील सर्वात वेगवान शतक झळकावले होते. या सामन्यातही आफ्रिकन संघ आपली लय कायम ठेवू इच्छितो. गेल्या महिन्यातच दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली होती आणि हा सामनाही जिंकण्याची इच्छा आहे.

हेही वाचा – IND vs AFG: अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर सचिन तेंडुलकरकडून बुमराह-रोहितचे कौतुक; म्हणाला, ‘दोन सामन्यामध्ये…’

दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन –

ऑस्ट्रेलिया: डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, पॅट कमिन्स (सी), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.

दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सेन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी.