South Africa vs Bangladesh, World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. या संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग सात सामन्यांमध्ये ३०० हून अधिक धावा केल्या आहेत. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने एकदिवसीय विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्याही केली आहे. आपल्या पाचव्या सामन्यातही दक्षिण आफ्रिकेने शानदार फलंदाजी करत बांगलादेशविरुद्ध ३८२ धावा केल्या. या सामन्यातही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले.

विश्वचषकात सर्वाधिक शतके

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने १४० चेंडूत १७४ धावा केल्या आणि अनेक विक्रम आपल्या नावावर केले. विश्वचषकात तीन शतके झळकावणारा तो पहिला दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक आहे. या बाबतीत कुमार संगकारा चार शतकांसह आघाडीवर आहे. डी कॉक तीन शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. एबी डिव्हिलियर्स आणि दोन शतके झळकावणारा झिम्बाब्वेचा ब्रेंडन टेलर दुसऱ्या स्थानावर आहे. डी कॉकच्या नावावर एक अनोखा विक्रम आहे. जेव्हा जेव्हा त्याने भारतात ५० हून अधिक धावा केल्या आहेत, तेव्हा त्याचे शतकात रूपांतर करण्यात तो यशस्वी ठरला आहे.

George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
India Women Vs Australia Women Cricket 2nd ODI India loses against Australia  sport news
भारतीय महिला संघाची पुन्हा हाराकिरी ; दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सर्वोच्च धावसंख्येसह सरशी
U19 Asia Cup Final Bangladesh Beat India by 59 Runs And Successfully Defend the Title INDU19 vs BANU19
IND U19 vs BAN U19: बांगलादेशची पोरं हुशार; युवा भारतीय संघाला नमवत पटकावलं U19 आशिया कपचं जेतेपद
Kalidas hirve , Vasai National Marathon Competition,
वसईत रंगली राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा, साताऱ्याचा कालिदास हिरवे विजेता
IND vs AUS 2nd Test Day 2 Highlights Only Twice Any Team Win Day Night Test After Conceding First Innings Lead
IND vs AUS: ॲडलेड कसोटीत भारताची स्थिती बिकट, दुसऱ्या दिवशी निम्मा संघ तंबूत; ‘हा’ रेकॉर्ड पाहता पराभव टाळणं कठीण
Travis Head Fastest Century in Day Night Test Match IND vs AUS Adelaide Test
Travis Head: ट्रॅव्हिस हेडचे डे-नाईट कसोटीत सर्वात जलद शतक, स्वत:चा रेकॉर्ड मोडत केली मोठी कामगिरी; भारत बॅकफूटवर

विश्वचषकात सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत तो संयुक्त तिसर्‍या क्रमांकावर आला आहे. भारताचा रोहित शर्मा या बाबतीत आघाडीवर आहे, ज्याने २०१९ विश्वचषक स्पर्धेत पाच शतके झळकावली होती. त्याचवेळी २०१५ मध्ये कुमार संगकाराने चार शतके झळकावली होती. मार्क वॉ, सौरव गांगुली, मॅथ्यू हेडन, डेव्हिड वॉर्नर आणि क्विंटन डी कॉक यांनी विश्वचषकात तीन शतके झळकावली आहेत. विश्वचषकात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांमध्ये डी कॉक दुसऱ्या क्रमांकावर आहे. विश्वचषकात केवळ एबी डिव्हिलियर्सने (चार शतके) त्याच्यापेक्षा जास्त शतके झळकावली आहेत. डी कॉकने तीन, हर्शल गिब्सने दोन, हाशिम आमलाने दोन आणि फाफ डू प्लेसिसनेही दोन विश्वचषक शतके झळकावली आहेत.

हेही वाचा: PAK vs AFG: पाकिस्तानच्या खराब कामगिरीवर मिकी आर्थरची संतापजनक रिअ‍ॅक्शन, चाहत्यांनी केलं सोशल मीडियावर ट्रोल

या विश्वचषकात ११४० षटकांत दक्षिण आफ्रिकेचा विक्रम

या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेने ११ ते ४० षटकांदरम्यान शानदार फलंदाजी केली आहे. याचे श्रेय हेन्रिक क्लासेन आणि एडन मार्कराम यांना जाते. पहिल्या सामन्यात आफ्रिकन संघाने ११-४० षटकांत दोन गडी गमावून २४३ धावा केल्या होत्या. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी तीन गडी गमावून १७९ धावा केल्या आणि नेदरलँड्सविरुद्ध सात विकेट्स गमावून १४३ धावा केल्या. इंग्लंडविरुद्ध चार विकेट्सच्या मोबदल्यात १९७ धावा ठोकल्या. बांगलादेशविरुद्ध एक विकेट गमावून १९४ धावा केल्या. एकूण, दक्षिण आफ्रिकेने ११-४० षटकांत ६.३७ च्या धावगतीने पाच सामन्यांत ९५६ धावा केल्या. यामध्ये ८४ चौकार आणि २३ षटकारांचा समावेश आहे.

या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या ११-४० षटकांत
प्रतिस्पर्धी संघठिकाणधावसंख्याधावाचौकारषटकाररनरेट
श्रीलंकादिल्ली२४३/२२४३८४२३८.१
ऑस्ट्रेलियालखनऊ१७९/३१७९८४२३५.९७
नेदरलँड्सधरमशाला१४३/७१४३८४२३४.७७
इंग्लंडमुंबई१९७/४१९७८४२३६.५७
बांगलादेशमुंबई१९४/११९४८४२३६.४६
एकूण ९५६९५६८४२३.३७

डी कॉकची या विश्वचषकात सर्वोतम धावसंख्या ही १७४ धावा केल्या. विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाने केलेली ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या होती. या बाबतीत गॅरी कर्स्टन नाबाद १८८ धावांसह अव्वल स्थानावर आहे. एबी डिव्हिलियर्स १६२ नाबाद धावांसह तिसर्‍या आणि अँड्र्यू हडसन १६१ धावांसह चौथ्या स्थानावर आहे. या विश्वचषकात डी कॉकने तीन शतके झळकावली आहेत.

वन डेमध्ये प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने सलग सातव्या सामन्यात ३०० हून अधिक धावा केल्या. यासह आफ्रिकन संघाने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाची बरोबरी केली. इंग्लंडने २०१९ मध्ये आणि ऑस्ट्रेलियाने २००७ मध्ये ही कामगिरी केली होती. क्लासेनने ३४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या विश्वचषकातील हे पाचवे जलद अर्धशतक ठरले.

Story img Loader