South Africa vs Bangladesh, World Cup: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मंगळवारी (२४ ऑक्टोबर) आयसीसी विश्वचषक २०२३च्या २३व्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशचे संघ आमनेसामने येतील. दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत ४ पैकी ३ सामने जिंकून चमकदार कामगिरी केली आहे. याउलट बांगलादेशने ४ पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला पराभूत केले आहे, तर नेदरलँड्सकडून त्यांना धक्कादायक पराभव पत्करावा लागला आहे. दुसरीकडे, बांगलादेशने फक्त अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवला असून त्यांना इंग्लंड, न्यूझीलंड आणि भारताकडून पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दक्षिण आफ्रिकेचे कर्णधार टेंबा बावुमा तर बांगलादेशचे कर्णधार शाकिब अल हसन आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील आकडेवारी

दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत २४ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी दक्षिण आफ्रिकेने १८ एकदिवसीय सामने जिंकले आहेत आणि बांगलादेशने ६ एकदिवसीय सामने जिंकले आहेत. तटस्थ ठिकाणी खेळल्या गेलेल्या ३ सामन्यांपैकी दक्षिण आफ्रिकेने एक सामना जिंकला आहे आणि बांगलादेशने २ सामने जिंकले आहेत.

IND vs ENG T20I Series Full Schedule Timings and Squads in Detail
IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Three Mumbai Indians are among the top 5 players to score the most runs in Tests at Wankhede Stadium
Wankhede Stadium : वानखेडेवर सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या टॉप-५ खेळाडूंपैकी पहिले तीन आहेत ‘हे’ मुंबईकर
Kagiso Rabada create history first SA20 2025 Bowler to bowl 2 consecutive maiden overs in the powerplay
SA20 2025 : कगिसो रबाडाने घडवला इतिहास! अश्विन-चहलला मागे टाकत ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाज
devendra fadnavis likely visit davos
दावोसमध्ये पुढील आठवड्यात जागतिक आर्थिक परिषद; सात लाख कोटींचे करार अपेक्षित
Vijay Hazare Trophy Maharashtra Haryana Karnataka and Vidarbha qualify for the semi finals 2024-25
Vijay Hazare Trophy : महाराष्ट्रासह ‘या’ चार संघांनी उपांत्य फेरीत मारली धडक! जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
IPL 2025 Time Table
IPL 2025 : ठरलं! ‘या’ दिवसापासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिला सामना ‘या’ तारखेला होणार
Image of Indian Cricket Team
Ind vs Eng T20 Series : इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड, तब्बल एक वर्षानंतर शमीचे पुनरागमन

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने एकदिवसीय सामन्यांमध्ये बांगलादेशकडून सहा सामने गमावले आहेत आणि यातील तीन सामने गेल्या चार वर्षांतील आहेत. २००७ आणि २०१९ मध्ये दोन्ही संघांमधील चार विश्वचषक सामन्यांमध्ये बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. ३ ऑक्टोबर २००२ रोजी दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने १६८ धावांनी विजय मिळवला. दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यातील शेवटची वन डे २३ मार्च २०२२ रोजी खेळली गेली, ज्यामध्ये बांगलादेशने ९ गडी राखून विजय मिळवला होता. तसेच, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत ४ सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी दक्षिण आफ्रिकेने २ सामने जिंकले आहेत आणि अफगाणिस्तानने २ सामने जिंकले आहेत.

हेही वाचा: PAK vs AFG: अफगाणिस्तानच्या विजयानंतर प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट भावूक; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या दोन्ही संघांचे एकदिवसीय सामन्यातील बलाबल

एकूण एकदिवसीय सामने: २४

दक्षिण आफ्रिका जिंकली: १८

बांगलादेश विजयी: ६

कोणतेही परिणाम नाहीत: ०

गेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा २२९ धावांनी पराभव केला होता. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ७ गडी गमावून ३९९ धावा केल्या. पण प्रत्युत्तरात या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला खराब कामगिरीमुळे पराभव पत्करावा लागला. बांगलादेशला गेल्या सामन्यात यजमान भारताविरुद्ध ७ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट्सच्या मोबदल्यात २५६ धावा केल्या होत्या. लिटन दासने संघाकडून सर्वाधिक ६६ धावांची खेळी खेळली. टीम इंडियाने अवघ्या ४१.१ षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला. शुबमन गिल (५३ धावा) आणि विराट कोहलीने १०३ धावांची नाबाद खेळी खेळली.

वानखेडे स्टेडियममधील खेळपट्टीचा अहवाल

वानखेडे स्टेडियमवर हा सामना मोठ्या धावसंख्येचा होईल अशी अपेक्षा आहे. वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्ग म्हटली जाते. तसेच, संध्याकाळी दव महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. अशा स्थितीत नाणेफेक दोन्ही संघांसाठी महत्त्वाची ठरते. षटकार आणि चौकारांचा पाऊस इथे पाहायला मिळतो. मात्र, सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना मदत होऊ शकते, कारण या सामन्यातील खेळपट्टीवर उसळी खूप आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघांची प्लेईंग-११

बांगलादेश: तनजीद हसन, लिटन दास, नझमुल हुसेन शांतो, शाकिब अल हसन (कर्णधार), मेहदी हसन मिराज, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्लाह, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद.

दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लिझार्ड विल्यम्स.

Story img Loader