South Africa vs Netherlands ICC Cricket World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषकाच्या १५व्या सामन्यात आज दक्षिण आफ्रिकेचा सामना नेदरलँडशी होत आहे. धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेसमोर पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात ४३ षटकात २४६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेदरलँड संघाने शेवटचे दोन्ही सामने गमावले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने शेवटचे दोन्ही सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेचे कर्णधार टेम्बा बावुमा तर नेदरलँड्सचे नेतृत्व स्कॉट एडवर्ड्सकडे आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय चुकला का? हे काही तासातच कळेल. याचे कारण ४३ षटकात या खेळपट्टीवर या धावसंख्येचा पाठलाग करणे तितकेसे सोपे असणार नाही.

नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवले २४५ धावांचे लक्ष्य

प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्सने आठ गडी गमावून २४५ धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला ४३ षटकात २४६ धावा कराव्या लागतील. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात नेदरलँडची सुरुवात खराब झाली. निम्मा संघ ८२ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. यानंतर कर्णधार एडवर्ड्सने शेपटीच्या फलंदाजांसोबत उत्कृष्ट भागीदारी करत संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले. नेदरलँड्सकडून कर्णधार चार्ल्स एडवर्ड्सने नाबाद ७८ धावा केल्या. व्हॅन डर मर्वेने २९ आणि आर्यन दत्तने ९ चेंडूत २३ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, मार्को जॅनसेन आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. जेराल्ड कोएत्झी आणि केशव महाराज यांना प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आले.

पावसामुळे सामना उशिराने सुरु झाला

धरमशालामध्ये पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने नाणेफेकीनंतर सामना दोन ते अडीच तासाने उशिरा सुरु झाला. नाणेफेकीला एक तास उशीर झाला २.३० वाजता आणि सामना ३ वाजता सुरू करण्याची योजना होती. मात्र, आता मुसळधार पावसामुळे संपूर्ण मैदान कव्हरने झाकले गेले होते. पंचांनी सामना दुपारी चार वाजता सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना ४३-४३ षटकांचा आहे. पहिला पॉवरप्ले एक ते नऊ षटकांचा असून पुढील पॉवरप्ले १०-३५ षटकांचा आणि अंतिम पॉवरप्ले ३६-४३ षटकांचा आहे. तीन गोलंदाज जास्तीत जास्त नऊ षटके टाकू शकतात, तर दोन गोलंदाज जास्तीत जास्त आठ षटके टाकू शकतात.

हेही वाचा: World Cup 2023: विश्वचषकात गांगुलीच्या खास विक्रमावर रोहितचे लक्ष्य, बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात धोनीलाही टाकू शकतो मागे

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे आहेत

नेदरलँड्स: विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामानुरु, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), सायब्रँड एंजेलब्रेक्ट, रॉल्फ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.

दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी, जेराल्ड कोएत्झी.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sa vs ned netherlands set a target of 246 runs for south africa captain edwards scored unbeaten 78 runs avw
Show comments