South Africa vs Netherlands ICC Cricket World Cup 2023: विश्वचषक २०२३ मध्ये अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड सामन्यानंतर दुसरा मोठा धक्का नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत एक इतिहास रचला. मंगळवारी १७ ऑक्टोबर रोजी धरमशाला येथे झालेल्या सामन्यात टी२० विश्वचषक २०२२ची पुनरावृत्ती करत दक्षिण आफ्रिकेला एकदिवसीय विश्वचषकात देखील चारीमुंड्या चीत केले. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात नेदरलँडने ३८ धावांनी ऐतिहासिक विजयाची नोंद केली. नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने शानदार अर्धशतकी खेळी केली. या विजयाने आता पुन्हा एकदा गुणतालिकेत तळाच्या संघांना उपांत्य फेरीत जाण्याचे दरवाजे उघडले आहेत.

नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा ३८ धावांनी पराभव केला आहे. या विश्वचषकातील दुबळ्या संघाने केलेला दुसरा मोठा पराभव आहे. यापूर्वी अफगाणिस्तानने इंग्लंडचा पराभव केला होता. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात दोन्ही डावांतून प्रत्येकी सात षटके कमी करण्यात आली. अशा परिस्थितीत ४३ षटकांच्या या सामन्यात नेदरलँडने प्रथम फलंदाजी करताना आठ गडी गमावून २४५ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ ४२.५ षटकांत केवळ २०७ धावा करू शकला आणि सामना ३८ धावांनी गमावला.

IND vs SA T20I Series Full Schedule With Date and Time with IST And Squads India South Africa
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेचं कसं असणार वेळापत्रक? भारतीय वेळेनुसार किती वाजता असणार सामना?
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
AUS vs PAK Match Updates Australia vs Pakistan 1st ODI
AUS vs PAK : पाकिस्तानची झुंज अपयशी, अखेरीस ऑस्ट्रेलियाने पहिल्या वनडेत मिळवला रोमहर्षक विजय
IND vs NZ Anil Kumble Lashes Out At Rohit Sharma and Gautam Gambhir
IND vs NZ : ‘तुम्ही फलंदाजांना दोष देऊ नका…’, मालिका गमावल्यानंतर अनिल कुंबळे रोहित-गौतमवर संतापले
IND vs NZ Harbhajan Singh Statement
IND vs NZ : ‘भारतासाठी ‘ती’ गोष्ट शत्रू ठरतेय…’, मायदेशात पहिल्यांदाच कसोटीत व्हाइट वॉश झाल्यानंतर हरभजन सिंगचे मोठे वक्तव्य
WTC Points Table India Lost 1st Spot After Consecutive 3 Test Defeat in India vs New Zealand
WTC Points Table: भारताने गमावले पहिले स्थान, WTC गुणतालिकेत सलग ३ पराभवांनंतर बसला मोठा धक्का
Rishabh Pant Shubman Gill Hits Fiery Fifty against New Zealand as India Got Good Start IND vs NZ 3rd Test Day 2
IND vs NZ: भारतीय संघाची टी-२० स्टाईल सुरूवात, पंत-गिलची झंझावाती अर्धशतकं; किवी गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
IND vs NZ India Lost 3 Wickets in Just 9 Balls Yashasvi Jaiswal Bowled Virat Kohli Suicidal Run Out on Day 1 of Mumbai test
IND vs NZ: ९ चेंडूत ३ विकेट्स आणि टीम इंडियाची हाराकिरी, रोहित-विराटने पुन्हा केलं निराश

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना नेदरलँडने ४३ षटकांमध्ये ८ बाद २४५ धावा केल्या. तसेच, प्रत्युत्तरात धावांचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाच्या पहिल्या चार विकेट्स स्वस्तात पडल्या. एकंदरीत दक्षिण आफ्रिका संघ चांगलाच अडचणीत आल्याचे पाहायला मिळाले. २४६ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघ मैदानात आल्यानंतर त्यांच्या पहिल्या चार विकेट्स एकापाठोपाठ एक अशा पडल्या. संघाची धावसंख्या ११.२ षटकात ४४ असताना आफ्रिकेने पहिल्या चार विकेट्स गमावल्या होत्या. टेंबा बावूमा १६, क्विंटन डी कॉक २०, रासी वॅन डर ड्यूसेन ४, तर ऍडेन मार्करम १ धाव करून तंबूत परतले.

नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेसमोर २४५ धावांचे लक्ष्य ठेवले होते

एकदिवसीय विश्वचषक २०२३ इंग्लंडपाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा संघही पराभवाचा बळी ठरला आहे. आफ्रिकेचा या विश्वचषकातील तीन सामन्यांतील हा पहिलाच पराभव आहे. याआधी या संघाने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते, मात्र नेदरलँडचा संघ मोठा पराभव करण्यात यशस्वी ठरला होता. पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला आणि दोन्ही डाव प्रत्येकी सात षटकांचे करण्यात आले. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेदरलँडची सुरुवात काही खास नव्हती. निम्मा संघ ८२ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. यानंतर कर्णधार एडवर्ड्सने शेपटीच्या फलंदाजांसोबत उत्कृष्ट भागीदारी करत संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले. नेदरलँड्सकडून कर्णधार चार्ल्स एडवर्ड्सने नाबाद ७८ धावा केल्या. व्हॅन डर मर्वेने २९ आणि आर्यन दत्तने ९ चेंडूत २३ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, मार्को जॅनसेन आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. जेराल्ड कोएत्झी आणि केशव महाराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

हेही वाचा: SA vs NED: स्कॉट एडवर्ड्सची कर्णधारपदाला साजेशी खेळी! दुबळ्या नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेला झुंजवले, विजयासाठी ठेवले २४६ धावांचे लक्ष्य

२४६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवातही काही खास नव्हती. ३६ धावांवर पहिली विकेट पडली. डी कॉक २० धावा करून बाद झाला. यानंतर बावुमाने १६ धावांची वैयक्तिक धावसंख्या सुरू ठेवली. मार्कराम एक धावा करून बाद झाला तर डसेन चार धावा करून बाद झाला. क्लासेन आणि मिलरने पाचव्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी करून काही आशा उंचावल्या, पण क्लासेन बाद झाल्यानंतर मिलर एकाकी पडला. यानसेन नऊ धावा करून बाद झाला. यानंतर मिलरनेही ४३ धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेचा पराभव निश्चित झाला. कोटझे २२ धावा करून बाद झाला. रबाडाने नऊ धावा केल्या. अखेर केशव महाराज आणि लुंगी एनगिडीने संघाची धावसंख्या २०७ धावांपर्यंत नेली. मात्र, असे असतानाही संघाला ३८ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्याच माजी खेळाडूने त्याच्याच संघाला आज पराभूत केले. रॉल्फ वॅन डर मर्व मूळचा दक्षिण आफ्रिकेचा आहे. सध्या तो नेदरलँड संघाकडून विश्वचषक खेळत आहे. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये आजच्या सामन्यात महत्वाची भूमिका पार पाडली. त्याने १९ चेंडूत २९ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. कर्णधार स्कॉट ऍडवर्ड्सनंतर ही नेदरलँड संघासाठी सर्वात मोठी खेळी ठरली. रॉल्फने दक्षिण आफ्रिका संघाकडून कारकिर्दीत २९ आंतरराष्ट्रीय सामने खेळळे आहेत. यातील १७ सामन्यांमध्ये आफ्रिकी संघ जिंकला, तर १० सामन्यात पराभूत झाला.

हेही वाचा: PAK vs AUS, World Cup: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानची चिंता वाढली; अनेक खेळाडू पडले आजारी, सराव सत्र रद्द?

दोन्ही संघांची प्लेईंग ११ पुढीलप्रमाणे आहेत

नेदरलँड्स: विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामानुरु, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), सायब्रँड एंजेलब्रेक्ट, रॉल्फ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.

दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी, जेराल्ड कोएत्झी.