SA vs NZ Final New Zealand Women’s Team won the T20 World Cup 2024 title : आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२४ च्या फायनल सामन्यात न्यूजीलंडने दक्षिण आफ्रिकेवर ३२ धावांनी मात करत प्रथमच जेतेपद पटकावले. त्याचबरोबर क्रिकेट जगताला टी-२० विश्वचषकाचा नवा विजेता मिळाला आहे. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १५८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाला निर्धारित २० षटकात ९ बाद १२६ धावाच करता आल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघ पुन्हा एकदा ‘चोकर्स’ ठरला आहे.

न्यूझीलंडची ही तिसरी विश्वचषक फायनल होती. आता २० ऑक्टोबर हा दिवस न्यूझीलंड क्रिकेट संघासाठी ऐतिहासिक ठरला आहे. त्यांनी २४ वर्षांनंतर विश्वचषक जिंकला आहे. याआधी न्यूझीलंड संघाने २००० साली महिला वनडे विश्वचषक जिंकला होता. मात्र, महिला टी-२० विश्वचषकावर पहिल्यांदाच नाव कोरले आहे. तसेच यंदाही दक्षिण आफ्रिका संघ ‘चोकर्स’चा शिक्का पुसण्यात अपयशी ठरला आहे. कारण या संघाचा सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये पराभव झाला.

India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
Team India Performance in Border Gavaskar Trophy played at Australia
Team India : टीम इंडियाची ऑस्ट्रेलियामध्ये कामगिरी खूपच निराशाजनक, तब्बल ‘इतक्या’ वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत पत्करावा लागलाय पराभव
Gautam Gambhir has challenged Australia ahead Border-Gavaskar Trophy
Gautam Gambhir : ‘कोणत्याही प्रकारची खेळपट्टी तयार करा, आम्ही…’, गौतम गंभीरने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाला दिले आव्हान
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय

दक्षिण आफ्रिकेचा सलग तिसऱ्या टी-२० विश्वचषक फायनलमध्ये पराभव –

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटसाठी हा निराशाजनक क्षण आहे. या सामन्यातील पराभवानंतर त्यांचा संघ खूपच निराश दिसत होता. दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ सलग दुसरा टी-२० विश्वचषक फायनल खेळत होता. यासोबतच त्यांचा संघ दुसऱ्या अंतिम फेरीतही पराभूत झाला. गेल्या फायनलमध्ये त्यांचा ऑस्ट्रेलियन महिला संघाकडून पराभव झाला होता, तर यावेळी त्यांना न्यूझीलंडच्या महिला संघाकडून पराभव पत्करावा लागला आहे. दरम्यान, पुरुषांच्या टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामनाही जून २०२४ मध्ये खेळवण्यात आला होता. जिथे त्यांच्या पुरुष संघाचाही भारतीय संघाने अंतिम फेरीत ७ धावांनी पराभव केला होता. एकंदरीत, दक्षिण आफ्रिकेने गेल्या एका वर्षात तीन टी-२० विश्वचषक फायनल गमावल्या आहेत.

हेही वाचा – भारताला हरवण्यासाठी रचिन रवींद्रने कशी केली होती तयारी? स्वत: खुलासा करताना मानले CSKचे आभार

अमेलिया केरने न्यूझीलंडसाठी खेळली सर्वात मोठी –

दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील महिला टी-२० विश्वचषक २०२४ च्या विजेतेपदाचा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आफ्रिकेसाठी मोठी चूक ठरला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडने २० षटकांत १५८/५ धावा केल्या. अमेलिया केरने न्यूझीलंडसाठी सर्वात मोठी खेळी खेळली, तिने ३८ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने ४३ धावा केल्या.

हेही वाचा – टॉम लॅथमही करणार होता रोहितने केलेली चूक, मात्र नशिबाने तारलं, विजयानंतर न्यूझीलंडचा कर्णधार काय म्हणाला?

१५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर सपशेल अपयशी ठरला. सलामीला आलेल्या कर्णधार लॉरा वोल्वार्ड आणि ताजमीन ब्रिट्स यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी ५१ धावा (४१ चेंडू) जोडल्या. ही अप्रतिम भागीदारी सातव्या षटकात संपुष्टात आली, जेव्हा ताजमीन ब्रिट्स १८ चेंडूत १ चौकाराच्या मदतीने १७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. या पहिल्या विकेटनंतर आफ्रिकन संघ सावरू शकला नाही. कर्णधार लॉरा वोल्वार्ड २७ चेंडूत ५चौकारांच्या मदतीने ३३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. येथून संघाने सातत्याने विकेट्स गमावल्या. ज्यामुळे त्यांना दुसऱ्या टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला.