Ryan Rickleton scores fastest double ton for South Africa in 17 years: दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. केपटाऊनमध्ये झालेल्या कसोटीत आतापर्यंत यजमान आफ्रिकन संघाचा दबदबा दिसून आला आहे, ज्यात त्यांनी पहिल्या डावात ४०० हून अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी प्रथमच कसोटीत सलामीला उतरलेल्या रायन रिकेल्टनच्या बॅटमधून उत्कृष्ट द्विशतक झळकावले.

रिकल्टनच्या खेळीच्या जोरावर रायनने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी एक नवा इतिहासही घडवला आहे, ज्यामध्ये तो WTC मध्ये आफ्रिकेसाठी द्विशतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे. रायन रिकेल्टनला कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच दक्षिण आफ्रिकेकडून सलामीला उतरण्याची संधी मिळाली, ज्याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. प्रथमच कसोटीत सलामीवीर म्हणून खेळताना द्विशतक झळकावणारा रायन हा दक्षिण आफ्रिकेचा दुसरा आणि जागतिक क्रिकेटमधील चौथा खेळाडू ठरला आहे.

Yashasvi Jaiswal First Indian Batter To Score 16 Runs in 1st Over of the innings IND vs AUS
IND vs AUS: यशस्वी जैस्वालने सिडनी कसोटीत रचला नवा विक्रम, भारताच्या कसोटी इतिहासात कोणालाही जमला नाही असा पराक्रम
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Sachin Tendulkar Praised Rishabh Pant Fiery Inning in Sydney Test Said He has rattled Australia from ball one
IND vs AUS: सचिन तेंडुलकरही ऋषभ पंतची वादळी खेळी पाहून भारावला, कसोटीत टी-२० स्टाईल पाहून म्हणाला; “त्याने ऑस्ट्रेलियाला…”
Jasprit Bumrah Faces Shocking Accusation of Using Sandpaper During Sydeney Test by Australian Fans Video
IND vs AUS: जसप्रीत बुमराहवर बूटमध्ये सँडपेपर लपवल्याचा ऑस्ट्रेलियन चाहत्यांचा आरोप; व्हायरल VIDEO मुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’
IND vs NZ Anil Kumble Lashes Out At Rohit Sharma and Gautam Gambhir
IND vs NZ : ‘तुम्ही फलंदाजांना दोष देऊ नका…’, मालिका गमावल्यानंतर अनिल कुंबळे रोहित-गौतमवर संतापले
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर

हेही वाचा – IND vs AUS: ऋषभ पंतने वादळी अर्धशतकासह घडवला इतिहास, ऑस्ट्रेलियात ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज

रायनच्या आधी १९८७ मध्ये श्रीलंकेसाठी ब्रेंडन कुरुप्पू, आफ्रिकेसाठी ग्रॅमी स्टिम आणि त्यानंतर डेव्हॉन कॉन्वे यांची नावे या यादीत समाविष्ट आहेत. २०१६ नंतर प्रथमच दक्षिण आफ्रिकेतील खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्यात यश मिळवले आहे. यापूर्वी २०१६ साली बेन स्टोक्स आणि हसिम आमला या दोघांनी द्विशतक झळकावले होते आणि त्या सामन्यातही शतक झळकावणारा टेम्बा बावुमा होता, ज्याने या केपटाऊन कसोटीतही शतकी कामगिरी केली आहे.

हेही वाचा – Yuzvendra Chahal Dhanashree Verma: युजवेंद्र चहल-धनश्री वर्मा घटस्फोट घेणार? इन्स्टाग्रामवर एकमेकांना केलं अनफॉलो, चहलने फोटोही केले डिलीट

कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच सलामीला उतरत द्विशतक झळकावणारे खेळाडू

रायन रिकेल्टन (दक्षिण आफ्रिका) – वि पाकिस्तान (केप टाऊन, २०२५)
ब्रेंडन कुरुप्पू (श्रीलंका) – विरुद्ध न्यूझीलंड (कोलंबो, १९८७)
ग्रॅमी स्मिथ (दक्षिण आफ्रिका) – विरुद्ध बांगलादेश (लंडन, २००२)
डेव्हॉन कॉन्वे (न्यूझीलंड) – विरुद्ध इंग्लंड (लंडन, २०२१)

हेही वाचा – IND vs AUS: सचिन तेंडुलकरही ऋषभ पंतची वादळी खेळी पाहून भारावला, कसोटीत टी-२० स्टाईल पाहून म्हणाला; “त्याने ऑस्ट्रेलियाला…”

पाकिस्तानविरुद्धच्या केपटाऊन कसोटी सामन्यात रायन रिकेल्टनने अवघ्या २६६ चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले, जे या फॉरमॅटमधील आफ्रिकन संघाचे चौथे द्विशतक आहे. या यादीत हर्षल गिब्सचे नाव पहिल्या स्थानावर आहे, ज्याने २००३ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या केपटाऊन कसोटी सामन्यात केवळ २११ चेंडूत द्विशतक पूर्ण केले होते.

आफ्रिकेसाठी कसोटीत सर्वात कमी चेंडूंमध्ये द्विशतक ठोकणारे खेळाडू

हर्शेल गिब्स – २११ चेंडू विरुद्ध पाकिस्तान (केप टाऊन, २००३)
ग्रॅमी स्मिथ – २३८ चेंडू विरुद्ध बांगलादेश (चितगाव, २००८)
गॅरी कर्स्टन – २५१ चेंडू विरुद्ध झिम्बाब्वे (हरारे, २००१)
रायन रिकेल्टन – २६६ चेंडू विरुद्ध पाकिस्तान (केप टाऊन, २०२५)
जॅक कॅलिस – २६७ चेंडू विरुद्ध भारत (सेंच्युरियन, २०१०)

Story img Loader