Sachin Tendulkar Interview: जगात क्रिकेटचा देव अशी ओळख निर्माण करणारा, ज्याच्यामुळे भारतात क्रिकेट सर्वदूर पसरले असा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर हा येत्या २४ तारखेला ५० वर्षाचा पूर्ण होणार आहे. त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत १०० शतके आणि १६४ अर्धशतके झळकावली असून त्याच्या आयुष्याचे तो येत्या २४ तारखेला अर्धशतक पूर्ण करणार आहे. त्यानिमित्ताने एबीपी माझा या वृत्तवाहिनीने त्याची मुलाखत घेतली आहे. त्यात त्याने अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. त्यात त्याने काही मजेशीर किस्से देखील सांगितले.

केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक म्हणजे सचिन तेंडुलकर. सर्वाधिक धावा करणारा तो पहिला प्रतिभावान क्रिकेटपटू आहे. त्याच्याकडे प्रभावी कामगिरीची मोठी यादी आहे. सचिन तेंडुलकरचा भारतात आणि परदेशातही मोठा चाहता वर्ग आहे. खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होणे हे ध्येय गाठण्याशी तुलना करता येते. शुक्रवारी झालेल्या एका मुलाखतीसाठी सचिन जेव्हा पोहचला तेव्हा त्याला एकाने चौकशी करत विचारले, “तुम्ही कसे आहात?” यावर तो म्हणाला की, “ त्याक्षणी मला पन्नाशीत प्रवेश केल्याची जाणीव झाली,” अशी मजेशीर आठवण सचिन तेंडुलकर याने सांगितली.

Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?
India Former Prime Minister Dr. Manmohan Singh Funeral Live Updates in Marathi
Dr. Manmohan Singh Death LIVE Updates : “देशाला त्यांच्या मार्गदर्शनाची गरज असताना ते आपल्याला सोडून गेले”, मनमोहन सिंग यांच्या निधनावर तुषार गांधींची खंत
Dr. Manmohan Singh passes away at 92
Dr. Manmohan Singh Passes Away : देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, आजचे शासकीय कार्यक्रम रद्द; मनमोहन सिंग यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार!
PM Narendra Modi and Manmohan singh
Dr. Manmohan Singh Passed away: डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
Dr. Manmohan Singh passes away at 92
Manmohan Sing Death : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, “माझे आदर्श आणि मार्गदर्शक..”

खराब कामगिरीवरून खेळाडूंना ट्रोल केले जाते- सचिन

सचिनने यावेळी निवडक पत्रकारांशी संवाद साधला. तो म्हणाला की, “ १९८९-९० साली ब्रॉडकास्टिंग माध्यमे खास करून कमी होती. त्यामुळे परदेशी दौरे असताना पत्रकार नेहमी खेळाडू आणि माध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये नियमित संवाद साधत होते. आम्ही एकाच खोलीत जेवण करत असू. त्यामुळे आमचे संबंध हे खूप जिव्हाळ्याचे होते. माध्यमांनाही मैदानाबाहेर खेळाडू कसा आहे ते समजत असे. त्यामुळे खेळाडूंच्या कारकिर्दीतील चढउतार त्यांना समजतात. अलीकडे मात्र एखादा खेळाडू दोन सामन्यात धावा किंवा विकेट्स घेऊ शकला नाही तर लगेच सोशल मीडियापासून ते सर्व माध्यमे त्याच्यावर तुटून पडतात, ट्रोल करतात.” याकडेही सचिनने लक्ष वेधले.

हेही वाचा: IPL 2023: “मी ग्लोव्हज घातलेले म्हणजे…”, सुंदर झेल घेऊनही पुरस्कार न मिळाल्याने धोनी नाराज, पाहा Video

सचिनने पत्रकारांचे आभार मानले

आपल्या वाटचालीत सातत्याने साथ देणाऱ्या माध्यमांचे सचिनने आभार मानले. ‘एक कौतुकाची थाप कामगिरी उंचावण्यात अधिक भर घालते यावर माझा विश्वास आहे. माध्यमांनी माझे कौतुक केले, त्यामुळेच मला कठोर मेहनत करण्यासाठी विश्वास मिळाला. मी काही कायमच यशस्वी ठरलो नाही. मला अपयशालाही सामोरे जावे लागले. अनेक दुखापतीतून सावरत पुढे गेलो. मात्र क्रिकेट या अजब खेळाने मला माझ्या पायावर उभे राहण्याची ताकद दिली. अपयशानंतर पुढे जोमाने वाटचाल करत राहणे आवश्यक असते. त्यासाठी आवश्यक असणारे पाठबळ तुम्ही मला दिलेत. तुमच्या मदतीविना मी हा टप्पा पार केला नसता.”

अर्जुनच्या पहिल्या विकेटवर सचिनने केले भाष्य

सचिन अर्जुनबद्दल म्हणाला की, “मी ज्यावेळी २०१३ साली निवृत्त झालो त्याचवेळी एक क्रिकेटर म्हणून नव्हे तर वडील म्हणून अर्जुनला जी काही मदत हवी आहे ती देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करत आहे. तो आता २३ वर्षांचा परिपक्व खेळाडू झाला असून त्याला फक्त क्रिकेटमध्येच करिअर करायचे आहे.”

हेही वाचा: MS Dhoni: “हा माझ्या करिअरचा शेवटचा टप्पा…”, धोनीने चेपॉक येथील शेवटच्या सामन्याचे संकेत दिले, चाहत्यांची अस्वस्थता वाढली

अर्जुन तेंडुलकरने २.५ षटकात १८ धावा देऊन भुवनेश्वर कुमारची विकेट घेतली. विजयानंतर मुंबई इंडियन्स संघ ड्रेसिंग रूममध्ये परतला तेव्हा सचिनने अर्जुनला बॅच दिला. हा बिल्ला मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये सामनावीराला दिला जातो. बिल्ला घातल्यानंतर सचिन म्हणाला की, “कुटुंबात किमान एक विकेट आली आहे. मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, जो लोकांना खूप आवडला आहे.”

Story img Loader