‘‘आपल्या निवृत्तीबाबतचा निर्णय घेण्यास मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर समर्थ आहे, याबाबत आपल्या तोंडाची वाफ प्रसारमाध्यमांनी दवडू नये,’’ असा टोला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) खेळ विकास व्यवस्थापक प्रो. रत्नाकर शेट्टी यांनी तिसऱ्या १९- वर्षांखालील कोका-कोला क्रिकेट स्पर्धेच्या घोषणेच्या वेळी लगावला. ही स्पर्धा १० राज्यांबरोबर ७० जिल्ह्य़ांमध्ये खेळवण्यात येणार आहे.
याबाबत शेट्टी पुढे म्हणाले की, सचिनच्या निवृत्तीबाबत बरेच वादविवाद रंगताना पाहत आहोत. मी नेहमीच म्हणत आलो आहे की, निवृत्तीचा निर्णय सचिनपेक्षा कुणीही योग्य घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही कृपया करून याबाबत चिंता करू नका. तो वीस वर्षांपेक्षा अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला आहे.
यावेळी त्यांनी राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी सचिनला निवृत्तीबाबत विचारणा केल्याच्या वृत्ताचाही इन्कार केला. पाटील यांनी सांगितले की, गेल्या दहा महिन्यांमध्ये ते सचिनला भेटलेले नाहीत. हे सारे जर प्रसारमाध्यमांचे खेळ असले तर त्याला पाटील काय करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा