नवी दिल्ली : आपल्या मुलाने क्रिकेटवर लक्ष केंद्रित करू नये असे पोलीस अधिकारी असलेल्या आईला वाटत होते. मात्र, आपला मुलगा क्रिकेटच्या २२ यार्डाच्या खेळपट्टीवरच रमणार हे वडिलांना माहीत होते. वडिलांनी बीडमध्ये ११ यार्डाच्या हिरवळीवर त्याचा सराव करवून घेतला. याच खेळपट्टीवरून भारताचा युवा फलंदाज सचिन धस उदयास आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतून भारताचा उद्याचा तारा क्रिकेटच्या नभागंणावर अवतरला असे म्हणण्याइतकी सचिनची कामगिरी झाली आहे. या विश्वचषकात ११६.६६च्या स्ट्राईक रेटने त्याच्या नावावर २९४ धावा जमा असून स्पर्धेतील सर्वोत्तम विजयवीरांमध्ये (फिनिशर) त्याची गणना केली जात आहे. ‘सुपर सिक्स’ फेरीत नेपाळविरुद्ध शतकी खेळी केल्यानंतर उपांत्य फेरीत त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केलेली ९६ धावांची निर्णायक ठरली. २४९ धावांचा पाठलाग करताना भारताची ४ बाद ३२ अशी स्थिती झाली होती. यातून सचिन आणि कर्णधार उदय सहारन यांनी भारताला बाहेर काढले. त्यामुळे भारताला नवव्यांदा अंतिम फेरीत धडक मारता आली.  

हेही वाचा >>>SAT20 : डर्बन सुपर जायंट्सविरुद्ध एडन मार्करमने घेतला अफलातून झेल, पाहा VIDEO

‘‘सचिन माझ्याकडे सर्वप्रथम आला, तेव्हा तो अवघा साडेचार वर्षांचा होता. बीडमध्ये त्या वेळेस पूर्ण खेळपट्टय़ा नव्हत्या. दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वीही तो अध्र्या टर्फवरच सराव करत होता,’’ असे सचिनमधील क्रिकेटपटूला पैलू पाडणारे प्रशिक्षक शेख अझर यांनी सांगितले.  वडील संजय हे सचिन तेंडुलकरचे मोठे चाहते. त्यामुळेच २००५ मध्ये मुलाचा जन्म झाल्यावर त्यांनी त्याचे नाव सचिन असेच ठेवले. हा सचिन त्याच सचिनसारखी १० क्रमांकाची जर्सी घालत असला, तरी तो विराट कोहलीचा चाहता आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin dhas successful performance in u19 world cup cricket tournament in south africa sport news amy
Show comments