भारताचा नवा क्रिकेट प्रशिक्षक आणि सहयोग नेमण्याची जबाबदारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सचिन तेंडलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड या माजी दिग्गजांवर सोपवली आहे. ही समिती बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया आणि सचिव अनुराग ठाकूर यांना प्रस्ताव सादर करेल, असे रविवारी झालेल्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आले.
‘‘राष्ट्रीय संघासाठी नवा प्रशिक्षक आणि सहयोगी नेमण्याची प्रक्रिया अध्यक्ष आणि सचिवांनी हाती घेतली आहे,’’ असे बीसीसीआयने नमूद केले आहे. विश्वचषक क्रिकेट स्पध्रेसह झिम्बाब्वेच्या डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ संपला. याचेवळी भारताचे माजी कर्णधार रवी शास्त्री संघ संचालक म्हणून कार्यरत होते.
सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर, भरत अरुण आणि आर. श्रीधर यांना पदावर कायम ठेवण्यात येईल, अशी चिन्हे दिसत आहेत. गांगुलीकडे भारताच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी दिली जाणार अशी चर्चा होती. मात्र या वृत्ताचे कार्यकारिणी समितीने खंडन केले.
याचप्रमाणे कार्यकारिणी समितीने २०१५ वर्षांसाठी अर्जुन पुरस्काराकरिता फलंदाज रोहित शर्माच्या नावाची शिफारस केली आहे.
सचिन, द्रविड, गांगुली भारताचा प्रशिक्षक ठरवणार
भारताचा नवा क्रिकेट प्रशिक्षक आणि सहयोग नेमण्याची जबाबदारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सचिन तेंडलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड या माजी दिग्गजांवर सोपवली आहे.
First published on: 27-04-2015 at 04:24 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin dravid ganguly to find new india coach