करोनाच्या तडाख्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण सचिनचे चाहते मात्र आपल्या देवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. सचिनचा जबरा फॅन असलेला अभिषेक साटम याने एक अतिशय अप्रतिम अशी कलाकृती साकारली आहे. संपूर्ण जगावर करोनाचं सावट असल्याने सचिनच्या वाढदिवसाला दरवर्षीप्रमाणे मोठं आर्ट वर्क करता येणार नाही, म्हणून त्याने सचिन करोनारूपी चेंडू टोलवतो असल्याचे एक पिक्सच्या मदतीने आर्ट वर्क तयार केले आहे. त्याने त्या कलाकृतीचा व्हिडीओदेखील शेअर केला आहे.

“गेली तीन-चार वर्षे मी मोठ्या रांगोळ्या काढून सचिन सरांना शुभेच्छा देतो, पण यंदा करोनामुळे मोठं आर्ट वर्क तयार करता येणार नाही, याची सुरूवातीला खंत होती. त्यानंतर थोडा विचार केला की आपण घरातच काही तरी करू शकतो. यासाठी माझे मित्र आबासाहेब शेवाळे आणि प्रतीक घुसळे यांच्याशी संवाद साधला. काय करता येईल या संबंधी विचार सुरू केला आणि एक कल्पना सुचली की घरात ज्या वस्तू आहेत त्या वापरून कलाकृती सादर करायची. कलेची आवड असल्याने घरात वेगवेगळ्या रंगाचे कागद होतेच. मग ठरवलं की अशी कलाकृती करूया ज्यामधून करोना बद्दल संदेश देता येईल”, अशा भावना अभिषेकने व्यक्त केल्या.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

पाहा तो व्हिडीओ –

कलाकृतीबाबत सांगताना अभिषेक म्हणाला, “सगळा विचार करून सचिन सरांचा एक फोटो निवडला, जो सध्याच्या परिस्थितीशी मिळता जुळता वाटला. जसा सचिन क्रिकेट मध्ये शॉट मारतो आणि बॉलला झोडपून काढतो, तसंच आता सगळ्यांनी करोनाला झोडपून काढण्याची गरज आहे. या आशयाचं ‘लढूया करोना विरुद्ध’ असा संदेश देणारं ५.५ x ३ फुटांच एक चित्र बनवलं. ज्यात अर्ध्या इंचाच्या आकाराचे चौकोन वापरण्यात आले आहेत. त्यासाठी काळा, निळा, पिवळा, पांढरा, हिरवा, लाल, पोपटी या रंगाच्या चौकोनाचा वापर केला गेला आहे. एकूण ९६३७ चौकोनांचा वापर करून ३ बाय ५.६ फुटांची कलाकृती १५ तासात साकारण्यात आली आहे.”

‘या’ जबरा फॅनबद्दल थोडंसं…

अभिषेक साटम याचे हा परळचा आहे. वडिल कलाकार असल्याने लहानपणापासूनच त्यालाही कलेची आवड आहे. लालबागसारख्या भागात लहानाचा मोठा झाल्यामुळे ती आवड वाढत गेली आणि बहरत गेली. सचिनचा तो खूप मोठा चाहता आहे. गेली १८ वर्षे सचिनबद्दल छापून आलेली वर्तमानपत्रातील कात्रणे, मासिक, पुस्तके त्याने केली आहेत. २०१७ साली २४ एप्रिल त्याने ४४ X २४ फुटांची रांगोळी काढली होती. त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड USA इथे झाली.

तसेच २०१८ च्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या टॉप १०० मध्ये त्याच्या रेकॉर्डची नोंद झाली. या कलाकृतीची दखल खुद्द सचिन तेंडुलकरने घेतली आणि याचा व्हिडिओ आणि फोटोज् 100MB या त्यांच्या App वर अपलोड केले.

२०१८ साली २४ एप्रिलला अभिषेकने रंगरेषा रांगोळी ग्रुपसह पेपर पोट्रेट करायचं ठरवलं. त्याप्रमाणे ५० X ३० फुटांचे पेपर पोट्रेट तयार केले. त्यासाठी सुमारे ४५० डझन पतंगाचा पेपर वापरला. हे पोट्रेट तयार करायला सुमारे २६ तास लागले. यासाठी त्याला अनेकांचे सहकार्य लाभले. या कलाकृतीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आणि सलग दुसऱ्यांदा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड च्या टॉप १०० रेकॉर्ड मध्ये त्याची निवड झाली. या दोन्ही कलाकृती परळ च्या आर्. एम. भट्ट हायस्कुलमध्ये साकारण्यात आल्या.

२०१९ ला सचिन तेंडुलकर सरांच्या ४६ व्या वाढदिवसानिमित्त नेरूळच्या सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये ४६ x २४ फुटांचं शिवण कामाच्या वस्तू वापरून पोट्रेट बनवलं. यासाठी उमंग मेहता या सचिनच्या डिझायनरची आणि साईश कांबळी यांची त्याने मदत घेतली. ही कलाकृती सचिनलाही खूप आवडली. या कलाकृतीचीही नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली. या तिन्ही कलाकृतींची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद होणं ही अभिषेकसाठी खूप मोठी गोष्ट आहे असं त्याने सांगितलं. त्यातच टॉप १०० मध्ये येणं ही त्याहून मोठी आनंदाची गोष्ट असल्याचे तो म्हणाला. या वर्षीही सचिनला वाढदिवसाला काहीतरी वेगळं गिफ्ट द्यावं म्हणून त्याने आगळंवेगळं आर्ट वर्क तयार केलं आहे.

 

Story img Loader