वानखेडेवरील आजचा १६ नोव्हेंबर २०१३ हा दिवस नक्कीच क्रिकेट जगतात ऐतिहासिक ठरेल. वेस्ट इंडिजचा शेवटची विकेट पडली आणि सर्वांचे लक्ष सचिनच्या जल्लोषाकडे होते.
कर्णधार धोनीने सचिनला खेळपट्टीवर उभे ठेवून दोन्ही बाजूने भारतीय संघातील खेळाडूंना उभे राहून टाळ्यांची मानवंदना देण्यास सांगितले. ही मानवंदनाही तितकीच विशेष ठरली सचिन ड्रेसिंगरूमकडे जाईपर्यंत संपूर्ण भारतीय संघाने पुढे जात सचिनला मध्ये ठेवून दोन्ही बाजूने उभे राहून अभिवादन केले. सचिनचे सामन्यानंतरच्या पारितोषिक वितरण समारंभातील वानखेडेवरचे भाषण ही बरेच काही सांगून गेले..
रवी शास्त्री यांनी माईकवर सचिनला दोन शब्द बोलण्यासाठी आमंत्रित केले आणि स्टेडियमवरील प्रत्येकाने उभे राहून क्रिकेटच्या महानायकाला अभिवादन केले.
सचिन…सचिन..!! वानखेडेवर घुमणारा हा जयघोष..सचिनला भाषणाच्या सुरुवातीलाच भावूक करत होता. सचिनने पहिल्यांदा आपल्या सर्व कुटुंबीयांचे आभार मानले..मिळालेल्या यशात संपूर्ण कुटुंबाला सचिन भागीदार समजतो. सचिनने व्यक्तीश: प्रत्येकाची त्याच्या आयुष्यातील सहभागाची ओळख करून दिली आणि आभारही मानले.
* आयुष्यातील पहिली बॅट बहिणीने दिली
क्रिकेटच्या समुद्रात जेव्हा मी एका थेंबाप्रमाणेही नव्हतो..मला कोणीही ओळखत नव्हते तेव्हा मला आजही आठवण आहे. माझ्या आयुष्यातील पहिली बॅट मला माझ्या बहिणीन दिली होती. तिने प्रत्येकवेळी मला प्रोत्साहन दिले.
* मोठ्या भावाने माझ्यासाठी त्याग केला
माझा मोठा भाऊ अजित..त्याच्या बद्दल मी काय बोलावे? माझ्या करिअरसाठी त्याने त्याग केला. त्याच्या त्यागामुळे मी आज इथवर आहे.
* आई-वडिलांमुळेच आज यशाच्या शिखरावर पोहोचलो
लहानपणापासून आई-वडिलांच्या संस्कारांमुळे मी घडत गेलो आणि स्वत:ची वेगळी ओळख बनवू शकलो. आई-वडिलांनी मला प्रत्येकवेळी सांभाळून घेतले. कधीकधी माझा त्रासही सहन केला. मी त्यांचा मनस्वी आभारी. आपला मुलगा यशस्वी व्हावा, शरिराने निरोगी रहावा याची काळजी आईला असते. प्रत्येक दौऱयावेळी मला फोन करून तब्येतीला पहिले जप..हे शब्द सामर्थ्य द्यायचे.
* या पुढचा प्रत्येक क्षण मुलांसाठी
सारा आणि अर्जुन..माझ्या आयुष्यातील दोन रत्न. आता दोघेही मोठे झालेत. सामन्यांमुळे त्यांचे वाढदिवस, शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि इतर काही महत्वाचे दिवस त्यांना देऊ शकलो नाही. मात्र, यापुढे सर्वक्षण आनंदाने त्यांच्याबरोबर सेलिब्रेट करेन.
* अंजलीने सुख-दु:खात साथ दिली
अंजलीने नेहमी माझ्या पाठीशी उभी राहीली. आमच्यात काही मुद्द्यांवरून दुमत देखील व्हायचे तरीसुद्धा तिने आजपर्यंत मला सांभाळून घेतले.

तरुण पिढीला सचिनच्या टिप्स..

* आपल्या स्वप्नांचा जिद्दीने पाठपुरावा करा
* यशासाठी कधीही शॉर्टकट वापरू नका
* मेहनतीवर विश्वास ठेवा, यश मिळत जाते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा