* मास्टर ब्लास्टर ८१ धावांवर बाद
* भारत विरुद्ध आँस्ट्रेलिया कसोटी सामना

भारत विरुद्ध आँस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना चैन्नईमध्ये सुरु आहे आज(रविवार) सामन्याच्या तिस-या दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ८१ धावांवर बाद झाला. आणि कसोटी कारकिर्दीतील ५२वे शतक पुर्ण करण्यात सचिनला अपयश आले. सचिन नॅथन लिआँनच्या गोलंदाजीवर त्रिफळाबाद झाला. दुस-या दिवासाअखेर ७१ धावांवर खेळत असलेल्या सचिनचे शतक पाहण्यासाठी स्टेडीयमबाहेर प्रेक्षकांनी रांगा लावल्या होत्या. तसेच रविवार असल्याने प्रेक्षकांची सकाळपासूनच स्टेडीयम गर्दी होती. सचिन तेंडुलकर ८१ धावांवर खेळत असतांना आँफस्पिनर नॅथन लिआँनच्या भेदक गोलंदाजीने सचिनच्या बॅटची कड घेऊन चेंडू थेट यष्टीवर येऊन आदळला. आणि प्रेक्षकांची सचिनचे कसोटी शतक पाहण्याची संधी पुन्ही हुकली.      

Story img Loader