एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केलेल्या रोहित शर्माचे भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने अभिनंदन केले आहे. ‘‘मी रोहितची खेळी पाहू शकलो नाही, पण दुसरे द्विशतक हे अद्भुत असेच आहे. रोहितच्या या द्विशतकी खेळीने आनंद झाला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वीची ही योग्य तयारी आहे,’’ असे सचिन म्हणाला. रोहितने गेल्या वर्षीही ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०९ धावांची खेळी केली होती.

Story img Loader