निवृत्त होण्याच्या टीकेचे लक्ष्य झालेला फलंदाज सचिन तेंडुलकर याची भारताचा विश्वविजेता ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने पाठराखण केली आहे. सचिनने टीकाकारांकडे लक्ष न देता त्याची इच्छा असेपर्यंत खेळत राहावे असा सल्ला आनंदने दिला आहे.
टीका करणे सोपे आहे, मात्र या टीकेचे दडपण घेत सचिनने निवृत्त होण्याचा घाईघाईने निर्णय घेऊ नये असे सांगून आनंद म्हणाला, फक्त तरुण खेळाडूंनाच खेळण्याचा हक्क आहे असे म्हणणे चुकीचे आहे. जर एखाद्या ज्येष्ठ खेळाडूची इच्छा असेल व त्याच्याकडे चांगली कामगिरी करण्याची क्षमता असेल तर त्याने त्याच्या इच्छेनुसारच खेळत राहावे. मला अजूनही खेळण्याची संधी मिळत आहे हे माझे भाग्यच आहे. मीदेखील चाळिशी ओलांडली आहे, मात्र मला अजूनही खेळावेसे वाटत असेल तर मी का खेळू नये. आमच्या खेळाबाबत वय फारसे महत्त्वाचे नाही. २००९चा डिसेंबर महिना काय किंवा २०१२चा डिसेंबर महिना काय, माझ्या खेळात फारसा फरक झालेला नाही. अजूनही विश्वविजेतेपद मिळविण्याची क्षमता माझ्याकडे आहे.
सचिनची क्रिकेट कारकीर्द सुरू होण्यापूर्वी मी बुद्धिबळाची कारकीर्द सुरू केली आहे आणि मी अजूनही खेळत आहे. लिअँडर पेसकडे अजूनही ऑलिम्पिकमध्ये बलाढय़ खेळाडूंना चिवट लढत देण्याची क्षमता आहे. सौरव गांगुलीही अजून चांगले क्रिकेट खेळू शकतो असे सांगून आनंद पुढे म्हणाला, शारीरिक कष्ट आवश्यक असलेल्या क्रीडाप्रकारांत तंदुरुस्तीच्या समस्या उद्भवतात.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा