भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने रिओ ऑलिम्पिकसाठीच्या भारतीय चमूचा सदिच्छादूत होण्याचा प्रस्ताव स्विकारला आहे. भारतीय चमूचा सदिच्छादूत म्हणून बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या नियुक्तीवरून गदारोळ निर्माण झाल्यानंतर भारतीय ऑलिम्पिक समितीने (आयओए) नेमबाज अभिनव बिंद्रा, सचिन तेंडुलकर आणि प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रेहमान यांना सदिच्छादूताच्या पदासाठी गळ घातली होती.
चरित्रपट काढून बॉलीवूडने माझ्यावर उपकार केले नाहीत; मिल्खा सिंगांचे सलीम खान यांना प्रत्युत्तर 
यापैकी अभिनव बिंद्राने या प्रस्तावाला तात्काळ मान्यता दिली होती. सलमान खानच्या सदिच्छादूतपदी नियुक्तीनंतर कुस्तीपटू योगेश्वर दत्त तसेच ज्येष्ठ धावपटू मिल्खा सिंग यांनी नाराजी व्यक्त केली होती. या पदावर एखाद्या क्रीडापटूची नेमणूक व्हावी, असा अनेकांचा आग्रह होता.
VIDEO: ऐश्वर्याकडून सलमानचे समर्थन 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा