सध्या सोशल मीडियावर एक अप्रतिम झेल खूप व्हायरल होत आहे. या झेलचा व्हिडीओ पाहून फलंदाज बाद आहे की नॉट आउट आहे याचा अंदाज लावणे कुणालाही अवघड आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा झेल पाहून युजर्सही क्रिकेटचे नियम बदलण्याची मागणी करत आहेत. आता हा व्हिडिओ स्वत: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.

सचिन तेंडुलकर, मायकल वॉन आणि जिम्मी निशमने हा व्हिडिओ शेअर करुन झेलचे कौतुक केले. या झेलचा व्हिडिओ पाहून वॉन याला आतापर्यंतचा सर्वात महान झेल म्हटले आहे. त्याचवेळी सचिन म्हणणे आहे की, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला फुटबॉल खेळता येते, तेव्हा असे घडते.

Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
माणदेशी फाउंडेशनच्या स्टेडियमचे सचिन तेंडुलकर याच्या हस्ते उद्घाटन
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
IND vs AUS Travis Head Reveals Discussion with Mohammed Siraj About Their Fight in 2nd test Watch Video
VIDEO: सिराज आणि हेडमध्ये नेमकं काय बोलणं झालं? सिराजने भांडण मिटवलं का? त्यावर हेड काय म्हणाला?

क्रिकेटमध्ये अनेकदा अंपायरच्या निर्णयावर आणि नियमांवर वाद होतात. बिग बॅश लीगमध्ये मायकेल नेसरने सीमारेषेबाहेर जाऊन हवेत उडी मारताना एक नेत्रदीपक झेल पकडला होता, ज्यावरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. नियमाचा हवाला देत अंपायरने फलंदाजाला आऊट दिले, त्यानंतर नियमात बदल करण्याची मागणीही करण्यात आली. आता स्थानिक सामन्यातही असेच दृश्य पाहायला मिळाले आहे.

सचिनने व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “जेव्हा तुम्ही क्रिकेटसोबतच फुटबॉल खेळणे माहित असणाऱ्या खेळाडूला आणता तेव्हा असे होते.” सचिनशिवाय मायकेल वॉनने व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “कदाचित आतापर्यंतचा सर्वात महान झेल आहे.”
वास्तविक, स्थानिक सामन्यातील झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये फलंदाजाने शॉट खेळल्यानंतर सीमारेषेवर तैनात असलेल्या क्षेत्ररक्षकाने चेंडू रोखण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. क्षेत्ररक्षकाने चेंडू रोखला, पण चेंडू सीमारेषेबाहेर हवेत गेला. यानंतर क्षेत्ररक्षक सीमारेषेबाहेर गेला आणि नंतर हवेत उडी मारून चेंडू आत फेकला. त्यानंतर सीमारेषेवरील दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने तो झेल घेतला. त्यामुळे अंपायरने फलंदाजाला बाद घोषित केले.

दरम्याने तरी देखील लोक या झेलला परफेक्ट मानत नाहीत. अशात नियमांनुसार ही झेल योग्य असला, तरी अशा नियमांमध्ये बदल करण्याची गरज असल्याचे सोशल मीडिया यूजर्सचे म्हणणे आहे.

Story img Loader