Sachin Tendulkar Got Angry: सचिन तेंडुलकरने १९९० च्या दशकात भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते. सचिनच्या मैदानातील रेकॉर्डला काही तोड नसली तरी कर्णधार म्हणून सचिनची जादू फार चालली नाही. सचिनच्या बाबत अनेकांच्या मनात आदर असूनही एकदा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याच्या वेळी सचिनला संघातील एका खेळाडूने अक्षरशः हैराण केले होते. अलीकडेच इन्फोसिसच्या एका कार्यक्रमात बोलताना सचिनने आपला हा अनुभव शेअर केला आहे. सचिनने यावेळी या संघातील खेळाडूला आपल्या स्वभावाच्या विरुद्ध जाऊन अगदी खडेबोल ऐकवले होते.
सचिनने सांगितले की जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होतो आणि मी संघाचा कर्णधार होतो तेव्हा टीममध्ये काही ज्युनिअर खेळाडू होते. यातील एकाच हा पहिला दौरा होता. काही केल्या त्याचे लक्ष केंद्रित करणे शक्य होत नव्हते. त्यामुळेच त्याच्याकडून मोठ्या चुका होत होत्या. जिथे सिंगल रन सुद्धा कठीण होते तिथे तो समोरच्या संघाला दोन दोन धावा द्यायचा. अशावेळी मी एकदा त्याला त्याची ओव्हर संपल्यावर बोलावून घेतले आणि स्पष्ट शब्दात समज दिली.
सचिनने या खेळाडूच्या खांद्यावर हात ठेवून याची आठवण करून दिली की तुझे स्थान घेण्यासाठी अनेकजण आसुसले आहेत त्यामुळे तो टीम इंडियामध्ये खेळणं अजिबात हलक्यात घेऊ नकोस. आणि जर तुला अजूनही समजत नसेल तर मैदानातून मी तुला हॉटेलमध्ये नाही तर थेट भारतात जाण्यासाठी तिकीट काढून देईन.
हे ही वाचा<< Video: सचिन तेंडुलकरचा रोमँटिक अंदाज झाला Viral; हॉटेलमध्येच असं काही केलं की अंजली लाजून..
दरम्यान, सचिनने भारतासाठी २५ टेस्ट सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. यातील चार सामने टीमने जिंकले होते तर १२ सामने ड्रॉ झाले होते. सचिन तेंडुलकरमी ७३ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले होते, ज्यात सचिनची विजयाची सरासरी ३१ टक्के होती.