Sachin Tendulkar Aamir Hussain Loan Video in ISPL T10 : इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग टी-१० (आयएसपीएल) च्या पहिल्या सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकरने जम्मू-काश्मीर पॅरा क्रिकेट संघाचा कर्णधार आमिर हुसैन लोनचा गौरव केला. दिग्गज तेंडुलकरने सांगितले की, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचा पहिला चेंडू आमिरला खेळवायचा हे त्याचे स्वप्न होते. मुंबईत खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेतील पहिल्या चेंडूचा आमिर हुसेनचा सामना केला, जो सचिन तेंडुलकरच्या मास्टर इलेव्हनचा संघाचा सदस्य होता.
अक्षय कुमारच्या ‘खिलाडी इलेव्हन’कडून टाकल्या गेलेल्या सामन्यातील पहिला चेंडूचा आमिरने केला. या सामन्यादरम्यान अनुभवी तेंडुलकरनेही आमिरचा गौरव केला. वास्तविक, सचिन मैदानावर आमिरची जर्सी घालून दिसला होता. याशिवाय आमिरने सचिनची १० नंबरची जर्सी घातली होती. सचिनने आमिरच्या संपूर्ण कुटुंबाला आमंत्रित केले होते.
आमिर हुसैन लोनने आयएसपीएलचा पहिला चेंडू खेळला –
सामना सुरू होण्यापूर्वी सचिन अपंग क्रिकेटपटू आमिर हुसैन लोनबद्दल म्हणाला, “इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचा पहिला चेंडू आमिरने खेळावा हे माझे स्वप्न होते.” यानंतर मास्टर ब्लास्टरने आमिरला मिठी मारली आणि यावेळी मैदानावर उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवल्या. त्यानंतर आमिरने अक्षय कुमारची भेट घेतली. सचिन तेंडुलकरने आमिरला क्रिकेटच्या मोठ्या मंचावर खेळण्याची संधी दिली. खिलाडी इलेव्हनविरुद्धच्या सामन्यात आमिर हुसैन सचिन तेंडुलकरसोबत ओपनिंग करताना दिसला.
आमिर हुसेनसाठी सचिन तेंडुलकर बनला विकेटकीपर –
सामन्यादरम्यान आमिरही गोलंदाजीसाठी आला होता. त्याने पायाने गोलंदाजी केली आणि त्याचा सामना बिग बॉस विजेता मुनावर फारुकी आणि अभिनेता अक्षय कुमारने केला. आमिर जेव्हा गोलंदाजी करायला आला, तेव्हा सचिन तेंडुलकरने स्वतः विकेटकीपिंगची जबाबदारी घेतली. विकेट कीपिंग करतानाही तो टाळ्या वाजवून आमिरचे कौतुक करताना दिसला. यानंतर फलंदाजी करताना सचिनसह आमिर सलामीला आला. यानंतर चाहत्यांनीही आमिरसह तेंडुलकरच्या मोठ्या मनाचे कौतुक केले.