Sachin Tendulkar in Chitale Bandhu New Advertise Video: शाळा आणि शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या भावविश्वाचा हळवा कोपरा. हा ऋणानुबंध खास असा. शिक्षणाच्या बरोबरीने आयुष्यभर उपयोगी पडेल अशी संस्कारांची शिदोरी देणारे ‘चितळे मास्तर’ विद्यार्थ्यांसाठी आधारवडच. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना जोडणारा दुवा म्हणजे क्रिकेटचं दैवत सचिन तेंडुलकर. आपापल्या क्षेत्रातला ‘सचिन’ होण्यासाठी गुरुमंत्र देणारे शिक्षक विद्यार्थ्यांसाठी आदरणीय. क्रिकेटमधला सार्वकालीन अढळस्थानी शिलेदार सचिन तेंडुलकर आणि गुरुशिष्याची जोडी मराठी माणसाच्या मनात स्थान पटकावणाऱ्या चितळे बंधूंच्या जाहिरातीत झळकली आहे.

हेही वाचा – PAK vs BAN: बांगलादेशकडून पराभूत झाल्यानंतरही पाकिस्तान WTC फायनलमध्ये पोहोचू शकतो? काय आहे समीकरण?

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani (2)
VIDEO : संसदेच्या आवारात राहुल गांधींनी घेतली ‘मोदी-अदाणीं’ची मुलाखत? विरोधी खासदारांनीच घातले मुखवटे
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
Salman Khan and Shah Rukh Khan attends Devendra Fadnavis Oath Ceremony
Video : मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला बॉलीवूडकरांची मांदियाळी! भर गर्दीत शाहरुख-सलमानच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष
Vinod Kambli Meet Sachin Tendulkar In Cricket Coach Ramakant Achrekar Memorial Inauguration Video Viral netizens getting emotional
VIDEO: ‘अशी वेळ शत्रूवर सुद्धा येऊ नये’; इच्छा असूनही मिठी मारु शकला नाही, विनोद कांबळी-सचिनच्या भेटीत नेमकं काय घडलं?

ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, ज्येष्ठ अभिनेत्री सुहिता थत्ते आणि युवा मराठी अभिनेता वैभव तत्ववादी यांच्या गोष्टीत ‘तो’ अवतरतो आणि गुरुजींचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावतात. चांगली कारकीर्द घडवणारा गुंड्या, गुरुजींना भेटायला येतो. ऑफिसला नेतानाच्या प्रवासात गुरुजींनी मायेने केलेल्या आठवणींना उजाळा देतो. चकाचक ऑफिसऐवजी गाडी जुन्या वळणाच्या वास्तूसमोर उभी राहते. गुरुजी वर येऊन त्याला बघतात आणि भरून पावतात. गुरुजींना यापेक्षा चांगली गुरुदक्षिणा काय असू शकते! चहा, बाकरवडी आणि क्रिकेटविश्वावर अधिराज्य गाजवत कोट्यवधींसाठी प्रेरणादायी ठरलेला ‘तो’ असं अनोखं मेतकूट या जाहिरातीच्या निमित्ताने जुळून आलं आहे.

चहा बाकरवडी आणि ‘तो’

हा तो म्हणजे सर्वांचा लाडका सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर लहानांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. सचिनला फलंदाजी करताना पाहणं म्हणजे पर्वणी. शब्दात कधीही न मावणारा अन् लिहून कधीही पूर्णत्व न येणारा असा सचिन तेंडुलकर आहे. सचिन जेव्हा भारतासाठी क्रिकेट खेळत असे तेव्हा तो बाद झाला की अनेकजण टीव्ही बंद करत असत आणि सचिन मैदानात आहे म्हणजे धावांची टांकसाळ उघडणारच हे नक्की. भारतीय संघ धावफलकांवर मोठी धावसंख्या उभारणार, याची खात्री असायची. अगदी आजही सचिनची एक झलक पाहण्यासाठी सारेच उत्सुक असतात. सचिन म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी एक हळवा, भावुक करणारा कोपरा आहे. हाच सचिन चितळे बंधूंच्या सुप्रसिद्ध बाकरवडीच्या जाहिरातीत आधी संवादातून आणि मग प्रत्यक्षातही दिसतो.

हेही वाचा – Vinesh Phogat Gold Medal: अखेर विनेश फोगटला ‘सुवर्ण पदक’ मिळालं; हरियाणाच्या खाप पंचायतीनं केलं प्रदान; विनेश म्हणाली, “माझा लढा…”

सचिनच्या इनिंग्स आणि अभ्यास

एवढं कर्तृत्त्व आणि यश संपादन करूनही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा कायम सर्वांसाठी सचिनच राहिला आहे, हे त्याचं व्यक्तिमत्त्वही या जाहिरातीत अधोरेखित केलं आहे. ही जाहिरात शिक्षक व विद्यार्थी यांच्या हक्काच्या नात्याची आहे. हॉस्टेलमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं आणि त्याला सचिनची जोड दिली आहे. गुरूजींना बऱ्याच वर्षांनी त्यांचा विद्यार्थी गुंड्या भेटायला आलेला असतो आणि तो त्यांना आपल्या नवं ऑफिस दाखवण्यासाठी घेऊन जातो. यादरम्यान हॉस्टेलमधील परिक्षांच्या काळातील एक किस्सा उलगडतो. यामध्ये गुरूजी हॉस्टेलमधील रात्री अभ्यास करणाऱ्या त्या विद्यार्थ्यांसाठी चहा करत आणि त्याबरोबर बाकरवडीचा बेत असे. मग ही सगळी मुलं ब्रेक घेऊन मेसमध्ये यायची. पण इतकेच नव्हे तर मेसमध्ये गुरूजी त्यांना व्हीसीआरमध्ये सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्ड करून ठेवलेल्या काही खेळी दाखवत असत.

सचिन तेंडुलकरचे मैदानावरील वेगवेगळे शॉट्स त्याचे कव्हर ड्राईव्ह, षटकार पाहण्यासारखा दुसरा आनंद तो काय असणार. जाहिरातीतील विद्यार्थीसुद्धा सचिनच्या इनिंग्स पाहून त्याने मारलेल्या एकेका शॉटप्रमाणे पेपरात येणारा प्रश्नही असा स्टेडियमबाहेर उडवू इतका आत्मविश्वास त्यांना मिळायचा, मुलंही सचिनच्या खेळी पाहून अभ्यासाचा विचाराने खचून न जाता पुन्हा ताजीतवानी होऊन अभ्यासाला लागायची. सचिन तेंडुलकर सर्वांप्रमाणेच गुरूजींचाही आवडता खेळाडू. पण साधारण सर्व लोकांप्रमाणे, चाहत्यांप्रमाणे गुरूजीही त्याला कधी भेटले नाही. पण त्यांच्या या विद्यार्थ्याने गुरूजी आणि त्याची भेट घडवली.

हेही वाचा – VIDEO: रागाच्या भरात कार्लाेस ब्रेथवेटने बॅटने हेल्मेटला चेंडूप्रमाणे उडवलं, हेल्मेट थेट सीमारेषेबाहेर


सचिन तेंडुलकर व गुरूजींची भावुक करणारी भेट

जाहिरातीत नवे ऑफिस पाहण्याच्या निमित्ताने गुरूजी सचिन तेंडुलकर शूट करत असतो तिथे पोहोचतात आणि सचिनला अनपेक्षितपणे पाहताच अगदी सर्वांना जसा सुखद धक्का बसेल तसाच गुरूजींनाही बसला. सचिन फलंदाजी करतानाची कॉमेंट्री अन् सचिन सचिनचा दुमदुमणारा आवाज ऐकू येतो, तेवढ्यात गुरूजी पुन्हा हॉस्टेलच्या दिवसांमध्ये जातात अन् गुंड्याचा प्रश्न त्यांना आठवतो. सचिनला सर तुम्ही कधी भेटले आहात की नाही, यावर सर नाही म्हणत तुम्हीच मोठे झालात की सचिनची भेट घडवून द्या असं ते सांगतात अन् गुंड्याने ही इच्छा पूर्ण केलेली असते.

सचिनही गुंड्याला ओळखत असून हॉस्टेलमधील चहा बाकरवडी आणि त्याच्या इनिंग्सबद्दल गुरूजींना विचारतो. तितक्यात मॅम सचिनला आधी तू म्हणत मग तुम्ही म्हणतात यावर सचिन म्हणतो तुम्ही नाही तू म्हणा… तितक्यात चहा-बाकरवडी येते. पण सचिनच्या इनिंग्स दाखवून गुरूजींनी विद्यार्थ्यांना आपापल्या क्षेत्रातील सचिन होण्याचा आत्मविश्वास त्याच्या खेळी दाखवत दिला होता.

हेही वाचा – WI vs SA: पुन्हा जिंकता जिंकता हरली दक्षिण आफ्रिका, अखेरच्या ५ षटकांत वेस्ट इंडिजने पालटला सामना, २० धावांत ७ विकेट…

“जिथे वृक्ष लावी तृणांना जिव्हाळा, तिथे अंकुरे नित्य आशा नवी” एकंदरीतच सचिन तेंडुलकर फक्त त्याच्या काळातील, आताच्या काळातील मुलांनाच नाही तर सर्वांनाच पिढ्यान् पिढ्या प्रेरणा देत आला आहे. प्रत्येक सामन्यातील त्याचे डावपेच, भेदक गोलंदाजांना सामना करतानाचं प्रसंगावधान अन् विचारपूर्वक त्याची खेळण्याची शैली पण याबरोबरच आपल्या रणनितीसह मैदानावर जास्त काळ टिकून राहत धावा करणं, याच गोष्टींनी त्याने साऱ्यांना प्रेरणा दिली आहे. चितळे बंधू अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. बाकरवडी-चहाच्या निमित्ताने त्यांनी क्रिकेटचं दैवत आणि गुरुशिष्य यांना एकत्र आणलं आहे.

सचिन तेंडुलकर चितळे बंधू मिठाईवालेचा ब्रँड अम्बेसेडर

सचिन तेंडुलकर फक्त जाहिरातीत नव्हे तर आता चितळे बंधूंचा ब्रँड अम्बेसेडरदेखील झाला आहे. अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून सचिनला आपल्या ब्रँडशी जोडत असल्याची घोषणा चितळे बंधू मिठाईवालेचे भागीदार इंद्रनील चितळे यांनी केली. सचिन तेंडुलकर यांनीही आमची विनंती स्वीकारली आणि त्यामुळे ही घोषणा आज करत आहोत, असेही सांगितले.

Story img Loader