मानाच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसचा पराभव केला. हे त्याच्या कारकिर्दीतील सातवे विम्बल्डन जेतेपद ठरले. नोव्हाकने त्याचे २१वे ग्रँडस्लॅम जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. यामध्ये भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचाही समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रविवारी (१० जुलै) विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर रंगलेल्या अंतिम सामन्यात नोव्हाकने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसचा ४-६, ६-३, ६-४, ७-६ असा पराभव केला. त्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिनने ट्वीट करून त्याला शुभेच्छा दिल्या. “सलग चार विम्बल्डन विजेतेपदं मिळवणं ही काही सोपी कामगिरी नाही. जोकोविचचा संयम, एकाग्रता आणि सातत्य हे त्याच्या खेळाचे वैशिष्ट्य आहे. तो निक किर्गिओसला प्रोत्साहन देत होता हे बघून आनंद झाला,” असे ट्वीट सचिनने केले आहे.

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू असलेला सचिन टेनिसचा मोठा चाहता आहे. स्वित्झर्लंडचा टेनिसपटून रॉजर फेडरर आणि सचिन खास मित्रदेखील आहेत. जेव्हा संधी मिळते तेव्हा सचिन टेनिस स्पर्धा बघण्यासाठी उपस्थित राहत असतो. त्यामुळे जोकोविचने ग्रँडस्लॅम जिंकल्यानंतर लगेचच सचिनने जाहिरपणे त्याचे कौतुक केले.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – “त्यांना एक्सपर्ट का म्हणतात हेच कळत नाही”; विराटवर टीका करणाऱ्यांचा रोहितनं घेतला समाचार

सचिन तेंडुलकर आणि नोव्हाक जोकोविच यांनी युनिसेफच्या एका मोहिमेसाठी एकत्र काम केलेले आहे. या मोहिमेत त्यांनी मुलांच्या विकासात वडिलांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले होते. या मोहिमेत त्यांच्यासोबत डेव्हिड बॅकहॅमदेखील होता.