Sachin Tendulkar congratulates Virat Kohli for equaling 49 ODI centuries record: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेतील ३७ वा कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला. या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने आले होते. हा सामना भारतीय संघाने विराट कोहलीच्या शतकाच्या आणि रवींद्र जडेजाच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर २४३ धावांनी जिंकला. भारतीय संघाचा हा सलग आठवा विजय ठरला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५ गडी गमावून ३२६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ २७.१ षटकांत ८३ धावांवर गारद झाला.

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात १०१ धावा करत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या ४९ वनडे शतकांच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. ही अप्रतिम कामगिरी केल्यानंतर विराट कोहलीवर अनेक माजी क्रिकेटपटू आणि चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पण सर्वात खास म्हणजे स्वत: सचिन तेंडुलकरने विराट कोहलीचे अभिनंदन केले.

shah rukh khan
शाहरुख खानने आर्यन व सुहानासाठी चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाला, “त्यांना ५० टक्के प्रेम…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
IND vs ENG Yuvraj Singh praises Abhishek Sharma innings against England at Wankhede stadium
IND vs ENG : ‘मला तुझ्याकडून हेच…’, अभिषेक शर्माच्या ऐतिहासिक शतकानंतर ‘गुरु’ युवराज सिंगने केले कौतुक
Marathi actor Sankarshan Karhade meet Sachin Tendulkar
“तू जमिनीवरचा देव दावला…”, सचिन तेंडुलकरच्या भेटीनंतर संकर्षण कऱ्हाडे भारावून गेला; पोस्ट लिहित म्हणाला, “पाच मिनिटं…”
Who Is Himanshu Sangwan He Clean Bowled Virat Kohli on Ranji Trophy Return
Ranji Trophy: विराट कोहलीला क्लीन बोल्ड करणारा हिमांशू सांगवान आहे तरी कोण? सेहवागचा आहे शेजारी
Virat Kohli Hugs Childhood Friend Shawez Khan During Ranji Trophy Practice
Virat Kohli: “बाबा…विराट कोहली खरंच तुमचा मित्र आहे?”, विराटने दिल्लीत बालपणीच्या मित्राला पाहताच मारली मिठी; मित्राचा लेक झाला चकित
IND vs ENG Tilak Varma reveals Head Coach Gautam Gambhir advice after Chennai T20I win
IND vs ENG : ‘काहीही झालं तरी…’, तिलक वर्माने विजयानंतर गौतम गंभीरने दिलेल्या गुरुमंत्राचा केला खुलासा
Tilak Verma and Suryakumar Yadav victory celebration video goes viral after India won Chepauk
Tilak Verma : तिलकच्या वादळी खेळीने जिंकलं सूर्याचं मन, वाकून सलाम करतानाचा VIDEO होतोय व्हायरल

सचिन तेंडुलकरने विराटचे केले कौतुक –

सचिन तेंडुलकरने कोहलीचे अभिनंदन करण्यासाठी ट्विटरचा वापर केला. माजी दिग्गजाने कोहलीचे ४९ व्या शतकाबद्दल केवळ अभिनंदनच केले नाही, तर त्याचा विक्रम मोडल्याबद्दल त्याला शुभेच्छाही दिल्या. सचिनने लिहिले, “विराट चांगला खेळलास. मला ४९ ते ५० पर्यंत पोहोचण्यासाठी ३६२ दिवस लागले होते. मला आशा आहे की, पुढील काही दिवसांत तू ४९ वरून ५० वर पोहोचशील आणि माझा विक्रम मोडशील. अभिनंदन!!”

३५ वा वाढदिवस साजरा करत असलेल्या विराटने ईडन गार्डनवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात शतक झळकावून ही कामगिरी केली. विराटने त्याच्या वाढदिवशी सचिनच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. श्रेयस अय्यरने ७७ आणि कर्णधार रोहितने ४० धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेसाठी एडन मार्कराम वगळता सर्व गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा – IND vs SA, World Cup 2023: “मी लहान असताना…”, सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केल्यानंतर विराट कोहलीने दिली प्रतिक्रिया

प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ ८३ धावा करू शकला. मार्को जॅन्सनने सर्वाधिक १४ धावा केल्या. त्याच्याशिवाय डुसेनने १३ आणि बावुमा-मिलरने ११-११ धावा केल्या. याशिवाय आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. भारताकडून रवींद्र जडेजाने पाच विकेट घेतल्या. मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली.

Story img Loader