Sachin Tendulkar Emotional Post for Sara Tendulkar: भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने आपली मुलगी साराने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्याबद्दल तिचे कौतुक केले आहे. सारा तेंडुलकरने युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमधून क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. सचिन तेंडुलकरने इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हीडिओ शेअर केला आहे. सचिन तेंडुलकरने या पोस्टसाठी भावुक करणारं कॅप्शन दिले आहे. वडिल सचिनने साराला तिची स्वप्ने पूर्ण व्हावीत यासाठी शुभेच्छा दिल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सचिनने शेअऱ केलेल्या पोस्टमध्ये एक व्हिडिओ आणि त्याची पत्नी अंजलीसोबतचा साराचा फोटो शेअर करून लिहिले: “हा खरंच एक सुंदर दिवस होता. ज्या दिवशी आमच्या मुलीने क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये डिस्टिंक्शनसह पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पालक या नात्याने, इथपर्यंत पोहोचण्यासाठी तू वर्षानुवर्षे केलेली तुझी मेहनत आम्ही पाहिली आहे ज्याचा आम्हाला अभिमान वाटतो. हे सोपं नव्हतं. भविष्यात तुझी सगळी स्वप्ने पूर्ण होवोत आणि आम्हाला खात्री आहे की ती पूर्ण करशीलचं. खूप सारं प्रेम.

सचिनची लाडकी लेक सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. तिचे इन्स्टाग्रामवर ५.८ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्सही आहेत. साराला मॉडलिंगची देखील आवड आहे. तिने अनेक ब्रँडसाठी मॉडेलिंग केले आहे. त्याचप्रमाणे काही जाहिरातींमध्येही सारा काम करताना दिसते. तिचे वेगवेगळे फोटो आणि तिचं सौंदर्य भुरळ घालणारी आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar daughter sara completes her masters with distinction proud father pens heartfelt message with video bdg