भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. सारा तेंडुलकरच्या पोस्ट, तिचे फोटो सतत ट्रेंड होत असतात. साराने आता मॉडेलिंगच्या दुनियेत प्रवेश केला आहे. सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असणाऱ्या साराचा चाहतावर्ग मोठा आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओंवर चाहते अनेकदा प्रतिक्रिया देतात. माजी क्रिकेटर सचिनची मुलगी सारा सध्या गोव्यात मस्ती करत आहे. गोव्याचा फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सारा तेंडुलकरने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तिने हॅलो गोवा असे कॅप्शन लिहिले आहे. फोटोमध्ये साराने एका हातात फूल धरले आहे आणि ती हसताना दिसत आहे. त्याच्या या फोटोवर चाहतेही मजेशीर कमेंट करत आहेत.

हेही वाचा – शाहरुख खानच्या तुफानी बॅटिंगपुढं समोरचा संघ गपगार, ठोकले ७ चौकार अन् ‘इतके’ षटकार!

महान फलंदाज सचिन तेंडुलकरची मुलगी साराने अलीकडेच तिच्या इंस्टाग्रामवर एक नवीन फोटो पोस्ट केला होता, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला दिसत होता. साराच्या प्रत्येक फोटोवर लाखो लाइक्स आणि कमेंट्स येतात आणि या लेटेस्ट फोटोवरही असेच काहीसे पाहायला मिळाले. मात्र, दरवेळप्रमाणेच यावेळीही चाहत्यांनी साराचे नाव भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शुबमन गिलसोबत जोडले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar daughter sara tendulkar on vacation in goa adn