लिटल मास्टर सुनील गावसकर यांच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील शतकांच्या विक्रमाशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने शुक्रवारी बरोबरी केली.  इराणी चषक स्पर्धेमध्ये शेष भारत संघाविरुद्ध खेळताना सचिनने शुक्रवारी शानदार शतक ठोकले.
गावसकर यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ८१ शतके ठोकली होती. त्याची बरोबरी तेंडुलकर याने आज केली. तेंडुलकर याने मुंबईकडून खेळताना प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये १८ शतके ठोकली आहेत. १९७१ ते १९९७ या काळात गावसकर यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये ८१ शतके केली होती. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सचिनने याआधी ८० शतके केली होती. शेष भारत संघाविरुद्ध त्याने आज ८१ वे शतक पूर्ण करताना नाबाद १४० धावा केल्या. 
शेष भारत संघाने पहिल्या डावात ५२६ धावा केल्या. मुंबईचा पहिला डाव आज ४०९ धावांवर संपला. त्यामध्ये सचिनने सर्वाधिक धावा केल्या आहेत.