* फेसबुकवर सचिनचे एक कोटीहून अधिक चाहते
क्रिकेटमध्ये विक्रम रचणाऱ्या सचिनने फेसबुकवर नवा विक्रम केलाय, सचिनच्या फेसबुक पेजवर चाहत्यांची संख्या एक कोटीच्या घरात पोहोचली आहे. फेसबुकवर सर्वाधिक चाहते असणाऱ्या भारतीयांमध्ये सचिन आता अव्वल स्थानावर आहे. आधुनिक ‘संगीत सम्राट’ म्हणून प्रसिद्ध असलेले संगितकार ए.आर.रेहमान यांच्या ‘फेसबुक पेज’ला मागे सारत सचिनने पहिले स्थान प्राप्त केले आहे. सचिनच्या आधी फक्त ए.आर.रेहमान यांच्या ‘फेसबुक पेज’ने एक कोटीचा आकडा पार केला होता. पण, सध्याच्या माहितीनुसार सचिनच्या फेसबुक पेजवरील चाहत्यांची संख्या आता ए.आर.ऱेहमान यांच्यापेक्षाही अधिक आहे.
लिटिल मास्टर तेंडुलकरच्या फेसबुक पेजवर १,००,०६,४२० चाहते(likes) आहेत आणि ३,९६,७०२ सचिनच्या पेज बाबत चर्चा(talking about this) करत आहेत. या पेजवर सचिनच्या व्हिडीओ आणि त्याची नवी छायाचित्रे पोस्ट केली जातात.
आयपीएल ६ मध्ये मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर सचिनसोबत घेण्यात आलेल्या संघाच्या सामुहीक छायाचित्राला १,७५,६५७ चाहत्यांनी ‘लाईक’ केले आहे. यावरूनच सचिनच्या फेसबुक पेजची लोकप्रियता लक्षात घेता येईल. त्याचबरोबर ‘आयपीएलच्या चषका’सोबत काढण्यात आलेल्या सचिनच्या छायाचित्राला ३,९२,७९५ चाहत्यांनी ‘लाईक’ केले आहे.
विक्रमवीर सचिनचा आणखी एक विक्रम
* फेसबुकवर सचिनचे एक कोटीहून अधिक चाहते क्रिकेटमध्ये विक्रम रचणाऱ्या सचिनने फेसबुकवर नवा विक्रम केलाय, सचिनच्या फेसबुक पेजवर चाहत्यांची संख्या एक कोटीच्या घरात पोहोचली आहे
First published on: 04-06-2013 at 03:18 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar facebook page likes goes more then one crore