सिडनी : दिग्गज भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरच्या ५०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रतिष्ठित सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (एससीजी) सोमवारी त्याच्या नावाच्या गेटचे अनावरण करण्यात आले. सचिन सोमवारी ५० वर्षांचा झाला. सचिनने ‘एससीजी’वर पाच कसोटी सामन्यांत १५७च्या सरासरीने ७८५ धावा केल्या. यामध्ये नाबाद २४१ ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. तेंडुलकरने भारताबाहेर ‘एससीजी’ हे आपले आवडते मैदान असल्याचे म्हटले.
‘‘भारताबाहेर सिडनी क्रिकेट ग्राऊंड हे माझे आवडते मैदान आहे. ऑस्ट्रेलियाच्या १९९१-९२च्या माझ्या पहिल्या दौऱ्यात या मैदानावर माझ्या खास आठवणी आहेत,’’ असे सचिनने ‘एससीजी’च्या निवेदनात म्हटले आहे. ‘एससीजी’ने ब्रायन लाराच्या २७७ धावांच्या खेळीला ३० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर वेस्ट इंडिजच्या या दिग्गज फलंदाजाच्या नावावरही एका गेटचे अनावरण केले. या दोन्ही गेटचे अनावरण ‘एससीजी’चे अध्यक्ष रॉड मॅकगियोच आणि ‘सीईओ’ कॅरी माथेर तसेच, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे ‘सीईओ’ निक हॉक्ले यांनी केले. खेळाडू आता लारा-तेंडुलकर गेटमधून मैदानात प्रवेश करतील. या गेटवर एक फलक लावण्यात आले असून त्यामध्ये दोन्ही खेळाडूंच्या कामगिरी आणि ‘एससीजी’वर त्यांच्या विक्रमाचे वर्णन करण्यात आले आहे.

‘‘ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. ‘एससीजी’मध्ये खेळाडू या गेटचा वापर करतील, ज्यावर माझे आणि माझा चांगला मित्र ब्रायनचे नाव आहे. मी याकरिता ‘एससीजी’ आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे आभार मानतो. लवकरच ‘एससीजी’ मी दौरा करेन,’’ असे सचिन म्हणाला. ‘‘मी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर केलेल्या या कृतीने मला सन्मानित झाल्यासारखे वाटत आहे आणि सचिनची भावनाही अशीच असावी असे मला वाटते. या मैदानावर माझ्यासह कुटुंबाच्या विशेष आठवणी आहेत आणि जेव्हा मी ऑस्ट्रेलियामध्ये असतो तेव्हा येथे येण्याने मला आनंद होतो,’’ असे लाराने सांगितले. तेंडुलकर व लारा आता डॉन ब्रॅडमन, अॅलन डेव्हिडसन व आर्थर मॉरिस यांच्या क्लबमध्ये सहभागी झाले आहेत. या सर्व खेळाडूंच्या नावे ‘एससीजी’मध्ये गेट आहे.

Ratan Tata Will News
Ratan Tata Will : रतन टाटांच्या मृत्यूपत्रात ५०० कोटींची मालमत्ता नावावर, कोण आहेत मोहिनी मोहन दत्ता?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Sachin Tendulkar CK Naydu Lifetime Achievement Award by BCCI in Naman Awards 2023 24
BCCI Naman Awards: सचिन तेंडुलकरला जीवनगौरव पुरस्कार! BCCI ने केला खास सन्मान; पाहा ऐतिहासिक क्षणाचा VIDEO
Ranji Trophy 2025 Virat Kohli security 3 fan reached on ground during fielding at Arun Jaitley Stadium Delhi
Ranji Trophy 2025 : विराट कोहलीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; रणजी लढतीदरम्यान तीन चाहते घुसले मैदानात
Leopard Safari at Sanjay Gandhi Park Announcement by Guardian Minister Ashish Shelar Mumbai news
संजय गांधी उद्यानात ‘बिबट्या सफारी’; पालकमंत्री आशिष शेलार यांची घोषणा
Sachin Tendulkar likely to get BCCI CK Nayudu Lifetime Achievement Award
Sachin Tendulkar : BCCI ने घेतला मोठा निर्णय! सचिन तेंडुलकरला आयुष्यात पहिल्यांदाच मिळणार ‘हा’ खास पुरस्कार
Former corporator protest , Chandrapur ,
चंद्रपूर : माजी नगरसेवकाचा खड्ड्यात बसून सत्याग्रह
Who Is Himanshu Sangwan He Clean Bowled Virat Kohli on Ranji Trophy Return
Ranji Trophy: विराट कोहलीला क्लीन बोल्ड करणारा हिमांशू सांगवान आहे तरी कोण? सेहवागचा आहे शेजारी
Story img Loader