सिडनी : दिग्गज भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरच्या ५०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रतिष्ठित सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (एससीजी) सोमवारी त्याच्या नावाच्या गेटचे अनावरण करण्यात आले. सचिन सोमवारी ५० वर्षांचा झाला. सचिनने ‘एससीजी’वर पाच कसोटी सामन्यांत १५७च्या सरासरीने ७८५ धावा केल्या. यामध्ये नाबाद २४१ ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. तेंडुलकरने भारताबाहेर ‘एससीजी’ हे आपले आवडते मैदान असल्याचे म्हटले.
‘‘भारताबाहेर सिडनी क्रिकेट ग्राऊंड हे माझे आवडते मैदान आहे. ऑस्ट्रेलियाच्या १९९१-९२च्या माझ्या पहिल्या दौऱ्यात या मैदानावर माझ्या खास आठवणी आहेत,’’ असे सचिनने ‘एससीजी’च्या निवेदनात म्हटले आहे. ‘एससीजी’ने ब्रायन लाराच्या २७७ धावांच्या खेळीला ३० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर वेस्ट इंडिजच्या या दिग्गज फलंदाजाच्या नावावरही एका गेटचे अनावरण केले. या दोन्ही गेटचे अनावरण ‘एससीजी’चे अध्यक्ष रॉड मॅकगियोच आणि ‘सीईओ’ कॅरी माथेर तसेच, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे ‘सीईओ’ निक हॉक्ले यांनी केले. खेळाडू आता लारा-तेंडुलकर गेटमधून मैदानात प्रवेश करतील. या गेटवर एक फलक लावण्यात आले असून त्यामध्ये दोन्ही खेळाडूंच्या कामगिरी आणि ‘एससीजी’वर त्यांच्या विक्रमाचे वर्णन करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा