Sachin Tendulkar’s funny question to fans: भारताचा मास्टर ब्लास्ट सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव मानले जाते. त्याचबरोबर भारतात क्रिकेट हा धर्म मानला जातो. खेळाडूंचीही देवाप्रमाणे पूजा केली जाते. क्रिकेटची आवड असणारा प्रत्येक माणूस स्वत:ला या खेळातील तज्ञ समजतो. गुरुवारी महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरने क्रिकेटशी संबंधित एक प्रश्न विचारला, ज्याचे उत्तर अनेक महान व्यक्तींकडे नव्हते. सचिनच्या या प्रश्नाने अनेक चाहत्यांना डोके धरायला भाग पाडले.
सचिन तेंडुलकरने एक्स (ट्विट) अॅपवर विचारला प्रश्न –
१४ सप्टेंबर हा दिवस भारतात हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. याबाबत गुरुवारी सचिन तेंडुलकरने यानिमित्ताने एक पोस्ट एक्स अॅपवर केल. या ट्विटमध्ये सचिनने चाहत्यांना काही क्रिकेट शब्दांचे हिंदी भाषांतर सांगण्यास सांगितले. सचिनने पोस्ट केली की, ‘तुम्ही मला सांगू शकाल का, खालील क्रिकेट शब्दांना हिंदीत काय म्हणतात?’ सचिनने चाहत्यांना विचारले की अंपायर, विकेटकीपर, क्षेत्ररक्षक आणि हेल्मेट यांना हिंदीत काय म्हणतात. सचिनच्या या प्रश्नाला अनेक चाहत्यांनी उत्तरे दिली आहेत.
क्रिकेट चाहत्यांनी दिली मजेशीर उत्तरे –
काही चाहत्यांनी अंपायरला अंपायर म्हटले, तर काहींनी त्याला निर्णय घेणारा म्हटले. काही चाहत्यांनी सांगितले की, अंपायरला हिंदीत आर्बिट्रेटर असेही म्हणतात. यष्टी रक्षक, फटकी का रखवाला आणि विकेट रक्षक असे अनेक हिंदी शब्दही यष्टीरक्षकासाठी दिले गेले. बहुतेक चाहत्यांनी क्षेत्ररक्षकासाठी क्षेत्ररक्षक हा शब्द वापरला. हेल्मेटसाठी अनेक हिंदी शब्दही चाहत्यांनी सुचवले. चाहत्यांच्या मते हेल्मेटला शिरस्त्राण, रक्षक, शीश कवच आणि टोप असे म्हणतात.
सचिन तेंडुलकरची आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सनेही यावर प्रयत्न केले. फ्रँचायझीने दिलेला प्रतिसाद खूपच मनोरंजक होता. फ्रेंचायझीने लिहिले…
Umpire – विपंच
Wicket-keeper – फटकी का रखवाला
Fielder – क्षेत्ररक्षक
Helmet – शिरस्त्राण
तसेच शिवानी नावाच्या युजरने प्रश्नांच्या एक पाऊल पुढे जाऊन अशी अनेक उत्तरे दिली. जी सचिनने विचारलीही नव्हती. तिने लिहले…
क्रिकेट: गोलगट्टम लकड़ पट्टम दे दनादन प्रतियोगिता
फलंदाज: बल्लेबाज
गोलंदाज : गेंदबाज
पंच: निर्णायक
यष्टिरक्षक : यष्टि- रक्षक
क्षेत्ररक्षक: क्षेत्ररक्षक
हेल्मेट: शीश कवच
काही चाहत्यांनी सचिनला केले ट्रोल –
या ट्विट पोस्टमुळे काही चाहत्यांनी सचिनला ट्रोलही केले. सचिन देशाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर ट्विट करत नसून ते हिंदी दिनानिमित्त करत असल्याचं ते म्हणाले. अनंतनाग चकमकीत शहीद झालेल्या जवानांऐवजी हिंदी दिनी ट्विट करणे हा योग्य निर्णय नसल्याचेही काहींनी म्हटले आहे.