सचिन तेंडुलकरच्या खेळाचं वैशिष्टय़ म्हणजे अफलातून टायमिंग. फटके मारतानाची वेळ अचूक साधणाऱ्या सचिन एवढी अचूकता साधणाऱ्या सचिनने निवृत्तीची वेळही अचूक साधल्याचे मत  ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्टने व्यक्त केले.
‘‘सचिनने झळकावलेल्या धावांपेक्षा त्याने क्रिकेटला दिलेले योगदान शिखराएवढे आहे. घरच्या मैदानावर तो दोनशेवी कसोटी खेळणार आहे. निवृत्ती घेण्यासाठी याहून चांगले औचित्य असू शकत नाही. खेळाला अलविदा कधी करावा, याची नस सचिनने बिनचूक ओळखली आहे. तो उगाचच खेळत राहिला आहे, असे घडलेले नाही. कारकिर्दीत कायम जपलेली वेळ त्याने निवृत्तीच्या वेळीही साधली आहे,’’ असे गिलख्रिस्टने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा