महेंद्रसिंग धोनीची गणना केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जे काही साध्य करण्याचे स्वप्न होते, ते सर्व साध्य केले. पण तुम्हाला माहित आहे का की, धोनीला कर्णधार बनवण्यात सर्वात मोठा हात होता, ज्याला क्रिकेटचा देव म्हटले जाते. त्या सचिन तेंडुलकरचा. होय, सचिन तेंडुलकरच्या शिफारशीमुळे धोनीला ज्युनियर असूनही संघाचे कर्णधारपद मिळाले.

धोनीने पहिल्यांदा २००७ च्या टी-२० विश्वचषकात संघाचे नेतृत्व केले होते. जिथे भारताला विजेतेपद मिळवण्यात यश आले होते. यानंतर धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०११ विश्वचषक तसेच २०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. ही तीन आयसीसी विजेतेपदे मिळवणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार आहे.

operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
माणदेशी फाउंडेशनच्या स्टेडियमचे सचिन तेंडुलकर याच्या हस्ते उद्घाटन
Nana Patole
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Eknath khadse Devendra fadnavis
देवेंद्र फडणवीस यांच्याशी केवळ तात्विक मतभेद, एकनाथ खडसे यांची भूमिका मवाळ

इन्फोसिसच्या एका कार्यक्रमात सचिन तेंडुलकरने धोनीला कर्णधार बनवल्याचा किस्सा सांगितला आहे. सचिन म्हणाला, ”मला जेव्हा कर्णधारपदाची ऑफर देण्यात आली, तेव्हा ते इंग्लंडमध्ये होते. मी म्हणालो की आमच्याकडे संघात खूप चांगला लीडर आहे. जो अजूनही ज्युनियर आहे. तो असा आहे की ज्याच्यावर तुम्ही बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. मी त्याच्याशी खूप गप्पा मारल्या आहेत, विशेषत: ज्या मैदानावर मी पहिल्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करायचो आणि तेव्हा त्याला विचारले की तुला काय वाटते?”

हेही वाचा – Flashback 2022: मोहम्मद हाफिजपासून ते रॉबिन उथप्पापर्यंत ‘या’ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला अलविदा, पाहा कोण-कोण आहेत

तो पुढे म्हणाला, “राहुल कर्णधार असला तरी, मी त्याला विचारले आणि मला मिळालेला प्रतिसाद अतिशय संतुलित, शांत, तरीही खूप परिपक्व होता. स्मार्ट कर्णधार म्हणजे विरोधी पक्षाच्या एक पाऊल पुढे राहणे. आपण म्हणतो त्याप्रमाणे जर कोणी हुशार असेल तर त्याने सतर्कतेने खेळावे, उत्कटतेने नाही. हे लगेच होत नाही, तुम्हाला १० चेंडूत १० विकेट मिळणार नाहीत. त्यासाठी नियोजन करावे लागेल. दिवसाच्या शेवटी स्कोअरबोर्ड महत्त्वाचा असतो. आणि ते गुण मला त्याच्यात दिसले. म्हणूनच मी त्याच्या नावाची शिफारस केली.”

Story img Loader