क्रिकेट कारकीर्दीतील दिमाखदार कारकीर्दीबद्दल भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या गौरवार्थ इंग्लंडमधील ईस्ट इंडिया कंपनीतर्फे सोन्याचे एक दुर्मीळ नाणे काढण्यात आले आहे. कंपनीतर्फे एका पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली. सचिनने क्रिकेट क्षेत्रात केलेल्या अनेक विक्रमांबद्दल ही नाणी तयार करण्यात आली आहेत. १२ लाख ३० हजार रुपयांइतके मूल्य या नाण्याचे असून फक्त २१० नाणीच तयार करण्यात आलीआहेत. प्रत्येक नाणे २०० ग्रॅम वजनाचे आहे. याबद्दल सचिनने सांगितले की, ‘‘भारताकडून खेळण्याचे स्वप्न मी २४ वर्षांपूर्वी पाहिले होते. २४ वर्षे क्रिकेट कारकीर्द करताना मी सतत देशास विजय मिळविण्याच्याच ध्येयाने खेळलो. इंग्लंडमध्ये तयार करण्यात आलेली सोन्याची नाणी खरोखरीच आकर्षक आहेत. खूप विचार करून त्याचे नक्षीकाम करण्यात आले आहे.’’ ‘‘या नाण्यावर गेट वे ऑफ इंडियाचे चित्र काढण्यात आले आहे. अतिशय मौल्यवान धातूंच्या साहाय्याने हे नाणे तयार करण्यात आले आहे,’’ असे ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव मेहता यांनी सांगितले.

Story img Loader