मुंबई : सरांनी आम्हाला छोट्या-छोट्या गोष्टींची किंमत शिकवली. आम्हाला ते नेट्स घेऊन यायला, खेळपट्टीवर रोलर फिरवायला आणि पाणी मारायला सांगायचे. यामुळे नकळत खेळपट्टीशी आमची अधिक ओळख होत गेली. आचरेकर सरांची क्रिकेट शिकवण्याची ही पद्धत होती. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. आज अनेक खेळाडू आपल्या अपयशाचे नैराश्य बॅट किंवा इतर साहित्य फेकून व्यक्त करतात. मात्र, आचरेकर सरांनी आम्हाला कायम या साहित्याचा आदर करण्यास शिकवले, अशी आठवण माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने सांगितली.

दिवंगत क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी शिवाजी पार्क येथे आचरेकर यांच्या स्मारकाचे सचिन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या वेळी आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवलेले विनोद कांबळी, बलविंदर संधू, प्रवीण अमरे, पारस म्हांब्रे, समीर दिघे, संजय बांगर या माजी क्रिकेटपटूंसह आचरेकर यांच्या कन्या विशाखा दळवी, तसेच या शिल्पासाठी पुढाकार घेणारे सुनील रामचंद्रन हे उपस्थित होते.

Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
minister Sanjay rathod
“मृद व जलसंधारण विभागात तीन हजार पदे भरणार”, मंत्री संजय राठोड यांची घोषणा; पालकमंत्रिपदाबाबत म्हणाले…
christmas celebrated with prayers in sangli
सांगलीत प्रार्थना, शुभेच्छांनी नाताळ साजरा
Public Works Minister Shivendra Raje, Satara Shivendra Raje,
साताऱ्यातील आम्ही चारही मंत्री एकत्रितपणे जिल्ह्याचा विकास करू, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजेंचा विश्वास
Tejashri Pradhan
तेजश्री प्रधानचा सिच्युएशनशिप, बेंचिंगबाबत तरुण पिढीला सल्ला; म्हणाली, “ज्या क्षणाला तुम्ही तुमचा आत्मसन्मान…”
Devarpade School, Dada Bhuse Visit Malegaon Taluka ,
मालेगावात शिक्षण मंत्र्यांनी घेतली विद्यार्थी अन् शिक्षकांची ‘शाळा’
yavatmal ashok uike loksatta news
यवतमाळ : शिस्तप्रिय भाजपमध्ये धुसफूस…मंत्र्याच्या सत्कार समारंभातच…

हेही वाचा >>> Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!

‘‘माझा भाऊ अजित क्रिकेट खेळायचा आणि आचरेकर सरांचे विद्यार्थी नसलेले खेळाडू खूप दडपण घेतात असे त्याला जाणवायचे. सरांचे विद्यार्थी मात्र कायम गाणी गात, मजा-मस्ती करत खेळायचे. ही बाब अजितने हेरली आणि त्याने मला आचरेकर सरांकडे आणले. मैदानाच्या फेऱ्या मारताना सरांची बारीक नजर असायची. त्यामुळे कोणीही शॉर्टकट मारला तरी सरांना काळायचे आणि त्याला आणखी एक फेरी मारावी लागायची. त्यामुळे लहानपणापासूनच आम्हाला यशासाठी शॉर्टकट न मारण्याची शिकवण मिळाली होती. सरांनी आमच्या कामगिरीचे कधीच थेट कौतुक केले नाही. ते दु:खी आहेत की आनंदी हे त्यांच्या देहबोलीतून कळायचे,’’ असे सचिनने सांगितले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘‘खरे तर हे स्मारक आधीच व्हायला पाहिजे होते. आचरेकर सर म्हटले की सचिन तेंडुलकर हे नाव सर्वप्रथम डोळ्यांसमोर येते, पण माझ्या मते जगात त्यांच्याहून अधिक खेळाडू कोणत्या प्रशिक्षकाने देशासाठी घडवले नसतील. आपल्याकडे पुतळे खूप झाल्याने मला येथे पुतळा नको होता. त्यामुळे आचरेकरांची ओळख होईल अशा स्मारकासाठी पुढाकार घेतला,’’ असे ठाकरे म्हणाले.

चालता फिरता जनरल स्टोअर

आचरेकर सर चालता फिरता जनरल स्टोअर होते. त्यांच्याकडे कोणतीही वस्तू मागितली तर ती असायची. सँडपेपर, कात्री, चाकू, गम, बँडेज अशा अनेक वस्तू सरांच्या खिशात असायच्या. सर्वांत ‘डेंजर’ म्हणजे सरांची छोटी चिठ्ठी. यावर खेळाडूंच्या चुका लिहिलेल्या असायच्या आणि त्यावरुन ते शाळा घ्यायचे. प्रत्येक खेळाडूच्या नावापुढे त्याने केलेल्या चुकीची निशाणी किंवा संकेतिक शब्द असायचा. एका सामन्यादरम्यान आम्ही फलंदाजी करताना एक पतंग आला. तेव्हा विनोदने (कांबळी) फलंदाजी सोडून पतंग उडवला. हे सरांनी बघितले. सामना संपल्यानंतर सरांनी चिठ्ठी काढली, तेव्हा विनोदच्या नावापुढे ‘काइट’ असे लिहिलेले होते. लगेच विनोदला मारही पडला, असेही सचिनने सांगितले.

Story img Loader