अवघ्या १६ व्या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदापर्ण करून सचिन तेंडुलकरनं जगभरातील क्रिडा प्रेमींच्या भुवया उंचावल्या. क्रिकेटच्या मैदानात धावांचा पाऊस पाडणाऱ्या सचिनला पाहून एक दिवस क्रिडा चाहत्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. कारण ‘गॉड ऑफ क्रिकेट’ सचिन तेंडुलकर क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातील ताईतच बनला होता, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. मैदानात टीम इंडियाची एन्ट्री होताच ‘सचिन सचिन’ नावाचा गजर वाजतो. पण एक दिवस उजाडला आणि सचिनसोबत संपूर्ण देश भावनाविवश झाला. तो दिवस म्हणजे १६ नोव्हेंबर 2013…सचिनच्या क्रिकेट करिअरचा शेवटचा दिवस. भारताने मुंबईत झालेल्या कसोटी सामन्यात वेस्टइंडीजचा पराभव केला अन् सचिनने निवृत्ती घोषीत केली.
सचिनच्या जीवनातील आणखी एक अविस्मरणीय दिवस म्हणजे १६ नोव्हेंबर २०१३…या दिवशी सचिन तेंडुलकरसोबत संपूर्ण भारत देश रडला. हा तो दिवस आहे, ज्यावेळी कोट्यावधी चाहत्यांच्या डोळे पाणावले. कारण याचदिवशी सचिनने ७० मिटरच्या मैदानाला शेवटचा रामराम ठोकला. सचिनने आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मुंबईतील नावाजलेलं वानखेडे स्टेडियम सचिनचं घरेलू मैदान होतं. याच मैदानात सचिनने भारताच्या विजयासोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सूवर्ण प्रवासाचा शेवट केला.
सचिनने त्याच्या शेवटच्या इनिंगमध्ये 75 धावा कुटल्या होत्या. वेस्टइंडीजच्या विरोधात त्याने चमकदार कामगिरी केली होती. भारताने हा सामना १२६ धावांनी जिंकला होता. पंरतु, त्यावेळी भारत जिंकला खरा, पण सचिनच्या डोळ्यांत अश्रू तरळले. शेवटच्या सामन्यानंतर सचिनने माध्यमांसमोर साधलेला संवाद ऐकून तमाम क्रिडा चाहते भावूक झाले. टीव्हीवरूनही सचिनला पाहणाऱ्या कोट्यवधी चाहत्यांचे डोळे पाणावले.
शेवटच्या भाषणात सचिन काय म्हणाला?
सचिनने त्याच्या शेवटच्या भाषणात म्हटलं, मी संपूर्ण आयुष्य इथंच घालवलं. एका सुंदर प्रवासाचा शेवट होत आहे, हा विचार करणं कठीण आहे. मला वाचून बोलायला आवडत नाही. परंतु, आज मी त्या लोकांची एक लिस्ट बनवली आहे. ज्यांचे मला आभार मानायचे आहेत. यामध्ये सर्वात पहिलं नाव माझ्या वडीलांचं आहे. माझ्या वडीलांचं निधन १९९९ ला झालं होतं. त्यांच्या शिकवणीशिवाय मी घडलो नसतो. तुमच्या स्वप्नांच्या मागे धावा, प्रवास कठीण असेल, पण कधीच हार मानायची नाही. आज त्यांची खूप आठवण येतेय. मी जेव्हा क्रिकेट खेळायला सुरू केलं, त्यावेळी त्यांनी माझ्यासाठी मनापासून प्राथर्ना केली.
…तर मी क्रिकेटर झालो नसतो, सचिन म्हणाला…
सचिनने त्याच्या शेवटच्या भाषणात मोठा भाऊ अजित तेंडुलकरचे आभार मानले. सचिनने म्हटलं, माझा भाऊ अजीत आणि मी या स्वप्नाला जीवंत ठेवलं. नेहमी ते माझा विचार करायचे, त्यांनी स्वत:च्या करिअरपेक्षाही मला मदत करायला जास्त प्राधान्य दिलं. पहिल्यांदा त्यांनी मला प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडे नेलं. ज्यावेळी मैदानात नसायचो तेव्हाही आमच्या दोघांमध्ये क्रिकेटच्या टेकनिक्सबाबत चर्चा व्हायची. माझा भाऊ माझ्यासोबत नसता तर मी क्रिकेटर झालो नसतो.