Sachin Tendulkar praises Wimbledon 2024 Champion Carlos Alcaraz : विम्बल्डन २०२४ टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या सामन्यात अल्काराझने जोकोविचचा पराभव करून विजेतेपद पटकावले. स्पॅनिश टेनिस स्टारने जोकोविचचा सरळ सेटमध्ये ६-२, ६-२, ७-६ अशा फरकाने पराभव केला. या जेतेपदानंतर अल्काराझवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशात क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही अल्काराझचे ऐतिहासिक विजयाबद्दल कौतुक केले आहे.

अल्काराझने सर्बियन स्टारचा सरळ सेटमध्ये पराभव केला –

या सामन्यात अल्काराझने सर्बियन स्टारचा सरळ सेटमध्ये पराभव केला. त्याचबरोबर कारकिर्दीतील चौथे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. तसेच त्याच्या शेवटच्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाचे रक्षण केले. ३६ वर्षीय सर्बियन स्टारकडे मागील पराभवाचा बदला घेण्याची सुवर्णसंधी होती. मात्र, तो असं करू शकला नाही आणि अल्काराझला ग्रँडस्लॅम विजेतेपदाचा बचाव करण्यात यशस्वी झाला आला.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
novak djokovic breaks roger federer record
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : जोकोविचचे ऐतिहासिक यश ; फेडररला मागे टाकत सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामन्यांत सहभाग
Adam Gilchrist says Sir Don Bradman would have troubled ahead Jasprit Bumrah in batting
Jasprit Bumrah : ‘….बुमराह असता तर ब्रॅडमनची सरासरी ९९ नसती’, आस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचं मोठं विधान
australian open 2025 novak djokovic defeats indian origin teen sensation nishesh basavareddy
तारांकितांची अपेक्षित सुरुवात; जोकोविचची भारतीय वंशाच्या निशेषवर मात; सिन्नेर, अल्कराझचेही यश
PV Sindhu gets emotional seeing Vinod Kambli's video
PV Sindhu: विनोद कांबळीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून पीव्ही सिंधू झाली भावनिक; पैसे, चांगली माणसं याबाबत केलं मोठं विधान
Virat Kohli Didnt Liked Ambati Rayudu Robin Uthappa Reveals 2019 World Cup Team Selection
Robin Uthappa on Virat Kohli: “विराटला तो आवडत नव्हता”, स्फोटक फलंदाजाला २०१९ च्या वर्ल्डकप संघातून वगळण्याबाबत रॉबिन उथप्पाचा मोठा खुलासा
Sabalenka Zverev progress
सबालेन्का, झ्वेरेवची विजयी सलामी

सचिन तेंडुलकरने अल्काराझचे केले कौतुक –

सचिन तेंडुलकरने अल्काराझचे ऐतिहासिक विजयासाठी कौतुक केले. तो म्हणाला, “आतापासून टेनिस विश्वावर फक्त एकाचे राज्य असेल, तो म्हणजे अल्काराझ. जागतिक दर्जाच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध विम्बल्डनची फायनल सरळ सेटमध्ये जिंकणे ही काही छोटी गोष्ट नाही. अशा प्रकारचा वेग, शक्ती, प्लेसमेंट आणि उर्जा यामुळे वाटते कार्लोस अल्काराझसाठी येत्या काही वर्षांमध्ये हे फायदेशीर ठरेल. जोकोविचला त्याच्या शालीनतेबद्दल आणि त्याने ज्या प्रकारे विजय-पराजयात स्वतःला ज्या प्रकारे सादर केले, त्याच्यासाठी त्याला सलाम. माझ्यासाठी हीच खऱ्या खेळाडूची ओळख आहे.”

हेही वाचा – Sanju Samson : सॅमसनने ११० मीटरचा षटकार ठोकत केला मोठा पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय

अल्काराझने चार ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली –

सर्बियन स्टार जोकोविचसाठी स्पॅनिश युवा खेळाडूला पराभूत करणे सोपे नव्हते. अल्काराझने आतापर्यंत चार ग्रँडस्लॅम फायनल खेळल्या आहेत आणि विशेष म्हणजे त्यात तो आतापर्यंत हरला नाही. २१ वर्षीय टेनिसस्टार हा गवत, क्ले आणि हार्ड कोर्ट या तीनही प्रकारच्या कोर्टवर ग्रँड स्लॅम ट्रॉफी जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू आहे. त्याने २०२२ मध्ये यूएस ओपनचे पहिले विजेतेपद जिंकले. यानंतर २०२४ मध्ये विम्बल्डनची फायनल जिंकली. त्याच वर्षी अल्काराझने त्याचे तिसरे ग्रँडस्लॅम जेतेपद फ्रेंच ओपनमध्ये जिंकले. रविवारी त्याने विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले. त्याने दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे.

Story img Loader