Sachin Tendulkar likely to get BCCI Lifetime Achievement Award : बीसीसीआय लवकरच वार्षिक पुरस्कार समारंभ आयोजित करणार आहे. अपेक्षेनुसार हा पुरस्कार सोहळा शनिवार १ फेब्रुवारी रोजी होऊ शकतो. याआधी बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. रिपोर्टनुसार, बीसीसीआय महान भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकरला सीके नायडू पुरस्काराने सन्मानित करू शकते. सचिनला यापूर्वी कधीही हा पुरस्कार मिळालेला नाही. म्हणजेच त्याला पहिल्यांदाच हा सन्मान मिळू शकतो. सचिनला जीवनगौरव म्हणून हा पुरस्कार दिला जाऊ शकतो. मात्र, सध्या फक्त एक शक्यता व्यक्त केली जात आहे, बीसीसीआयने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सचिनला आतापर्यंत कोणकोणते पुरस्कार मिळालेत?

सचिनला यापूर्वी भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय त्याला अर्जुन पुरस्कार, खेलरत्न, पद्मश्री, पद्मविभूषण आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. २०१२ मध्ये त्याला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियानेही गौरविण्यात आले होते. आयसीसी आणि बीसीसीआयनेही सचिनला अनेक क्रीडा पुरस्कार दिले आहेत.

सचिनने भारतासाठी एक टी-२०, विक्रमी २०० कसोटी आणि ४६३ एकदिवसीय सामने खेळले आहेत, म्हणजे एकूण ६६४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या काळात त्याने कसोटीत विक्रमी १५९२१ धावा आणि एकदिवसीय सामन्यात १८४२६ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके ठोकण्याचा विक्रमही सचिनच्या नावावर आहे. त्यामुळेच बीसीसीआयने त्यांच्यासाठी हे मोठे पाऊल उचलले आहे.

हेही वाचा – Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू झाला संघाबाहेर; काय आहे कारण?

आतापर्यंत कोणत्या खेळाडूंना सीके नायडू पुरस्कार मिळालाय?

सीके नायडू पुरस्काराबद्दल बोलायचे तर सचिनपूर्वी भारतीय क्रिकेटमधील अनेक दिग्गजांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शेवटच्या वेळी २०२३ मध्ये टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यांच्यापूर्वी लाला अमरनाथ, सय्यद मुश्ताक अली, विजय हजारे, केएन प्रभू, हेमू अधिकारी, सुभाष गुप्ते, मन्सूर अली खान पतौडी यांनाही हा पुरस्कार मिळाला आहे.

हेही वाचा – VIDEO: आधी हँडशेकला नकार, आता चॉकलेट आणि फुलं; उझबेकिस्तानच्या बुद्धिबळपटूने मागितली भारताच्या वैशालीची माफी

सुनील गावसकर, बीबी निंबाळकर, चंदू बोर्डे, बिशनसिंग बेदी, ए वेंकटराघवन, ईएस प्रसन्ना, बी.एस. चंद्रशेखर, मोहिंदर अमरनाथ, सलीम दुराणी, अजित वाडेकर, कपिल देव, दिलीप वेंगसरकर, सय्यद किरमाणी, राजिंदर गोयल, पद्माकर शिवलकर, के श्रीकांत आणि फारुख इंजिनियर यांनाही सीके नायडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar likely to get bcci ck nayudu lifetime achievement award vbm