Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : क्रिकेट विश्वातले द्रोणाचार्य अशी ओळख असलेले रमाकांत आचरेकर सर यांनी क्रिकेटमधली एक पिढी घडवली. त्यांचा पट्टशिष्य किंवा क्रिकेट विश्वातल्या द्रोणाचार्यांचा अर्जुन ठरला आपला सगळ्यांचा लाडका सचिन तेंडुलकर. सचिन बरोबर आणखी एका खेळाडूची त्या काळी चर्चा होती. तो खेळाडू होता विनोद कांबळी. आचरेकर सरांच्या जयंती निमित्त शिवाजी पार्क या ठिकाणी आचरेकर सरांचं स्मारक उभं करण्यात आलं. यावेळी विनोद कांबळी उपस्थित होता. त्याला पाहताच सचिन त्याच्याकडे गेला. राज ठाकरे तो क्षण पाहात राहिले. हा व्हिडीओ ( Sachin Tendulkar Meet Vinod Kambli ) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज ठाकरे काय म्हणाले?

राज ठाकरेंच्या संकल्पनेतून अनोखं स्मारक तयार करण्यात आलं आहे. राज ठाकरे या प्रसंगी म्हणाले गुरुपौर्णिमेला दरवर्षी सचिन आणि अनेक विद्यार्थी आचरेकर सरांच्या पाया पडायला यायचे. पण आज-कालची गुरुपौर्णिमा हॅपी गुरुपौर्णिमा मेसेजवर थांबते. गुरु नावाची गोष्ट जपणं हे फार महत्त्वाचं असतं, असं राज ठाकरे म्हणाले. सुनील रमणी यांच्याशी मी बोललो. इथे आचरेकर सरांचे स्मारक असावं असं मला वाटत होतं. पण मला इथे त्यांचा पुतळा नको होता. इथे स्टम्प, बॅट, सर्व काही आहे. यावर आचरेकर सरांची कॅप आहे. ही स्पेशल कॅप त्यांची ओळख होती, आज क्रिकेट बदललंय. साऱ्या गोष्टी बदलल्यात. पण त्यांनी खेळाडूंवर केलेले संस्कार त्यांच्या समोर बसलेल्या खेळाडुंमध्ये दिसतात. आजही विद्यार्थी सांगतात आम्हाला तेंडुलकर, कांबळीसारखं खेळता येत नाही. आचरेकर सर जिनियस होते, असंही राज ठाकरे म्हणाले. शिक्षक नावाची गोष्ट राहिली नाही. दहावी, बारावीची मुलं येतात. काय करणार पुढे? असं मी विचारल्यावर मी डॉक्टर, इंजिनीअर होणार असे सांगतात. पण एकही विद्यार्थी मला शिक्षक व्हायचंय असं सांगतात. ज्या देशात विद्यार्थ्यांना शिक्षक व्हायचं नाही त्या देशाचं काय होणार? अशी खंतही राज ठाकरेंनी व्यक्त केली. यावेळी सचिनने जेव्हा विनोद कांबळीला पाहिलं तेव्हा काय घडलं आपण जाणून घेऊ.

हे पण वाचा- “आचरेकर सरांच्या कर्मभूमीत…” शिवाजी पार्कमध्ये होणार सचिन तेंडुलकरच्या गुरूंचे स्मारक

व्हिडीओत काय दिसतं आहे?

सचिनने विनोद कांबळीला पाहिलं आणि तो तातडीने त्याच्या जवळ गेला. विनोद कांबळी व्हिलचेअरवर बसून आला होता. ( Sachin Tendulkar Meet Vinod Kambli ) सचिनचे हात त्याने हातात घेतले. मात्र विनोद कांबळीला ( Sachin Tendulkar Meet Vinod Kambli ) उठून उभंही राहता येत नव्हतं. सचिनने त्याच्याशी हात मिळवले, त्याच्याशी संवाद साधला आणि तो पुढे निघून आला. हा संपूर्ण क्षण राज ठाकरेंनी डोळ्यात साठवला. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे दोघंही एकेकाळचे आघाडीचे फलंदाज होते. मात्र विनोद कांबळी क्रिकेट सोडून अनेक गोष्टींमध्ये अडकत गेला त्यामुळे त्याचं क्रिकेट मागे पडलं आणि त्याच्यावर आता ही वेळ आली आहे. मात्र या सगळ्या घटना घडूनही सचिन मैत्री विसरला नाही. राज ठाकरे ही दृश्यं ( Sachin Tendulkar Meet Vinod Kambli ) पाहातच उभे होते.

विनोद कांबळीने कुठलं गाणं म्हटलं?

रमाकांत आचरेकर सरांच्या आठवणींबद्दल विनोद कांबळीला बोलण्याची विनंती करण्यात आली. त्यावेळी थरथरत्या हातांनी विनोद कांबळीने माईक हातात घेतला. पण त्याला स्पष्टपणे बोलता येत नव्हतं. त्याची ही अवस्था पाहून साऱ्यांनाच वाईट वाटलं. विनोद म्हणाला, “मला नक्कीच आचरेकर सरांची आठवण येते. मी आता काय बोलू.. मला फक्त एक गाणं म्हणायचंय. आचरेकर सरांना कोणतं गाणं आवडायचं तुम्हाला माहिती आहे का? असा प्रश्न त्याने उपस्थित मुलांना विचारला. यानंतर मी शॉर्टकटमध्ये सरांचं आवडतं गाणं म्हणतो, असं म्हणत विनोद कांबळीने ‘सरजो तेरा चकराये…’ या गाण्याच्या ओळी गुणगुणल्या आणि लव्ह यू आचरेकर सर असं म्हणत भाषण संपवलं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar meet vinod kambli kambli on wheel chair said this thing about ramakant achrekar scj