ऑस्ट्रेलियातील यावेळीच्या ‘बीग बॅश लीग’साठी सिडनी थंडर संघाकडून भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला काही कोटींचा आकर्षक प्रस्ताव देण्यात आल्याचे सिडनीतील वृत्तपत्राने म्हटले आहे.
या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियातील यावेळीच्या बीग बॅश लीगसाठी सचिन तेंडुलकरला सर्वाधिक मानधन देऊन संघात समावेश करण्याचा विचार सिडनी थंडर संघाने केला असून त्यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच सचिनला देण्यात येणार आहे. त्यासंबंधीच्या तांत्रिक विषयांवर सध्या चर्चा सुरू असल्याचेही या वृत्तपत्राने म्हटले आहे.
सिडनी थंडर संघात मायकल हसी, ब्रेट ली या दिग्गज खेळाडूंचाही समावेशही आहे. आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर क्रिकेट हा माझा प्राणवायू असल्यामुळे यापुढेही क्रिकेटचे थोडेफोर डोस घेत राहील आणि क्रिकेटच्या जवळच राहीन असे सचिनने याआधीच म्हटले आहे. त्यामुळे या प्रस्तावानंतर सचिनची यावरील भूमिका महत्वाची ठरणार आहे.
‘बीग बॅश लीग’साठी सचिनसमोर ‘आकर्षक’ प्रस्ताव
ऑस्ट्रेलियातील यावेळीच्या 'बीग बॅश लीग'साठी सिडनी थंडर संघाकडून भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला काही कोटींचा आकर्षक प्रस्ताव देण्यात आल्याचे सिडनीतील वृत्तपत्राने म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-01-2014 at 01:40 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar offered attractive package for playing in big bash league report