Sachin Tendulkar Post Made Sushila Meena Star: सचिन तेंडुलकरने काही दिवसांपूर्वी एका मुलीचा गोलंदाजी करतानाचा व्हायरल झालेला व्हीडिओ आपल्या अकाऊंटवरून शेअर केला होता. राजस्थानमधील एक मुलगी वेगवान गोलंदाजाप्रमाणे गोलंदाजी करतानाचा हा व्हीडिओ आहे, जो चांगलाच व्हायरल झाला होता. सचिन तेंडुलकरने हा व्हीडिओ शेअर करत त्या मुलीची तुलना झहीर खानसारखी गोलंदाजी करत असल्याचे केली आणि झहीरला पोस्टमध्ये टॅगदेखील केलं. झहीरनेही सचिनच्या ट्विटला उत्तर देत सचिनशी सहमती दर्शवली होती. आता सचिनच्या ट्विटनंतर तिची दखल घेण्यात आली आहे.

कोण आहे व्हायरल व्हीडिओमध्ये गोलंदाजी करणारी मुलगी?

गोलंदाजी करणाऱ्या या मुलीचं नाव सुशीला मीना आहे. जी राजस्थानच्या आदिवासी भागातील प्रतापगडमध्ये राहते. सुशीला गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. तिला क्रिकेटची आवड आहे आणि ती गोलंदाजी करते. सुशीला मीनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणि तेंडुलकर झहीर खानने तिची प्रशंसा केल्यानंतर, उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांनी या मुलीशी संवाद साधला.

dhananjay munde valmik karad
Dhananjay Munde: “हे घ्या धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे धडधडीत पुरावे”, अंजली दमानियांनी सातबारेच केले शेअर!
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Ladki Bahin Yojana
Maharashtra News LIVE Updates : लाडकी बहिण योजनेसंदर्भात आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची अपडेट…
Vinod Kambli Diagnosed with Clots in Brain| Vinod Kambli Health Update
Vinod Kambli Health Update: विनोद कांबळींच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी, मोफत उपचार करण्याचा रुग्णालयाचा निर्णय
bhopal crime news
Bhopal Crime: वृद्ध आजारी आईला घरात बंद करून मुलगा फिरायला गेला, महिलेचा तहान-भुकेनं दुर्दैवी मृत्यू!
Rohit Sharma Statement on Tanush Kotian Selection in Team India Said Kuldeep Did not have a Visa IND vs AUS
IND vs AUS: “कुलदीपकडे व्हिसा नाही आणि अक्षर…”, रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, तनुष कोटियनला संधी देण्यामागचं सांगितलं खरं कारण
Vinod Kambli Message to Sachin Tendulkar
Vinod Kambli : विनोद कांबळीचं वक्तव्य, “मी मरणार नाही, सचिनला निरोप द्या, मी लवकरच…”
Sunil Yadav assassination
Lawrence Bishnoi Gang : अमेरिकेत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर सुनील यादवची हत्या; लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी

हेही वाचा – Vinod Kambli: विनोद कांबळींच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी, मोफत उपचार करण्याचा रुग्णालयाचा निर्णय

उपमुख्यमंत्र्यांबरोबरच क्रीडामंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांनीही मोबाइलवरून व्हिडिओ कॉलद्वारे तिच्याशी संवाद साधला. या दोघांनी सुशीला या मुलीला क्रिकेटमध्ये प्रगती करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. ही तरुणी आदिवासीबहुल भागातील धारियावाड गावातील रहिवासी आहे. क्रीडामंत्र्यांनी सांगितले की, सरकार सुशीलाला तिची प्रतिभा वाढवण्यासाठी पूर्ण मदत करेल.

हेही वाचा – IND vs AUS: “कुलदीपकडे व्हिसा नाही आणि अक्षर…”, रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, तनुष कोटियनला संधी देण्यामागचं सांगितलं खरं कारण

उपमुख्यमंत्री दिया कुमारी आणि क्रीडा मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांनी मदतीचे आश्वासन दिल्यानंतर राजस्थान रॉयल्सही पुढे आले. राजस्थान रॉयल्सचे उपाध्यक्ष राजीव खन्ना म्हणाले की, हरहुन्नरी मुलगी सुशीला मीना हिला अकादमीमध्ये भरती केले जाईल. जेणे करून तिला चांगले प्रशिक्षण देता येईल आणि त्याच्यातील कलागुणांना अधिक वाव मिळेल.

हेही वाचा – IND vs AUS: “विराट यातून स्वत: मार्ग…”, रोहित शर्मा विराट कोहलीच्या बाद होण्याच्या पद्धतीवर नेमकं काय म्हणाला?

सुशीला मीना हिच्याशी व्हीडिओ कॉलवर बोलतानाचा व्हीडिओ उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांनी सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आणि लिहिले की, ‘प्रतापगडची होतकरू क्रिकेटपटू सुशीला मीना जी यांच्याशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधला आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच ती ज्या शाळेच्या मैदानात सराव करते ते आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्याचे आश्वासन दिले.

उपमुख्यमंत्र्यांनी पुढे लिहिले की, ‘संपूर्ण राजस्थानसाठी हा अभिमानाचा क्षण आहे की सुशीलाच्या गोलंदाजीची स्तुती महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने केली होती. त्यांनी तिच्या त्याने त्याच्या गोलंदाजीचे वर्णन महान गोलंदाज झहीर खानच्या गोलंदाजीसारखे केले, जो तिच्या अफाट प्रतिभेचा पुरावा आहे.”

Story img Loader