World Cup 2023, AUS vs AFG : यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतला ३९ वा सामना ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानमध्ये खेळवण्यात आला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मंगळवारी (७ नोव्हेंबर) खेळवण्यात आलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३ गडी आणि १९ चेंडू राखून अफगाणिस्तानवर मात केली. ग्लेन मॅक्सवेलच्या वादळी द्विशतकामुळे ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावून घेतला. विश्वचषक २०२३ मध्ये अफगाणिस्तानने पाचवेळच्या वर्ल्डकप चॅम्पियन झालेल्या ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणले होते. परंतु, मॅक्सवेलने वादळी द्विशतकी खेळी करत विजयश्री खेचून आणली. या विजयाने ऑस्ट्रेलियाचं उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित झालं आहे.

अफगाणी गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी एकीकडे गुडघे टेकलेले असताना दुसरीकडे, मॅक्सवेलने एक बाजू लावून धरली होती. त्याने चौकार-षटकारांचा वर्षाव सुरूच ठेवला. त्याला कर्णधार पॅट कमिन्सने चांगली साथ दिली. या सामन्यात एकवेळ अशी होती की कांगारूंच्या सात विकेट्स केवळ ९१ धावांत पडल्या होत्या. मात्र, अफगाणिस्तानने ग्लेन मॅक्सवेलचे चार झेल सोडून त्याला जीवदान दिले. पायाचे स्नायू दुखावल्याने (हॅमस्ट्रिंग) मॅक्सवेल पळून धावा काढू शकत नव्हता. तरीही त्याने हार मानली नाही. त्याने केवळ चौकार षटकार फटकावून द्विशतक लगावलं.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
India wins the match as well as the series against South Africa
भारताचा दणदणीत विजय; तिलक वर्मा व संजू सॅमसनची धमाकेदार कामगिरी
Australia Beat Pakistan by 29 Runs in 7 Over Game PAK vs AUS 1dt T20I Gabba Glenn Maxwell Fiery Inning
AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी
Tilak Varma Statement on Maiden T20I Century Flying Kiss Celebration He Said It is For Suryakumar Yadav Gives credit to him IND vs SA
IND vs SA: तिलक वर्माने शतकानंतर कोणाला फ्लाईंग किस दिला? सामन्यानंतर स्वत:च सांगितलं…
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’

मॅक्सवेलच्या या खेळीमुळे त्याच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. क्रिकेटचा देव अशी ख्याती असणाऱ्या भारतरत्न सचिन तेंडुलकरनेही मॅक्सवेलचं कौतुक केलं आहे. सचिनने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यात त्याने म्हटलं आहे की, “इब्राहिम झादरानच्या अप्रतिम खेळीने अफगाणिस्तानचा संघ सुस्थितीत होता. अफगाणिस्ताने गोलाजीतही सुरुवातीच्या काही षटकांत उत्तम खेळ केला. सामन्यातील पहिली ७० षटकं ते उत्तम खेळले. परंतु, ग्लेन मॅक्सवेलची शेवटच्या २५ षटकांमधील कामगिरी त्यांचं नशीब बदलण्यासाठी पुरेशी होती.” मॅक्सवेलच्या खेळीचं कौतुक करताना सचिन म्हणाला, माझ्या आयुष्यात मी पाहिलेली एकदिवसीय सामन्यातली ही सर्वोत्तम खेळी आहे.

हे ही वाचा >> World Cup 2023 : मॅक्सवेलआधी ‘या’ धडाकेबाज फलंदाजांनी वर्डकपमध्ये द्विशतक ठोकलंय

दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा तीन गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह कांगारुंच्या संघाने उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्य फेरी गाठणारा ऑस्ट्रेलिया हा तिसरा संघ ठरला आहे. आता चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत २९१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने सात गड्यांच्या मोबदल्यात, ४६.५ षटकात २९३ धावा केल्या आणि सामना जिंकला.