Sachin Tendulkar Praised Rishabh Pant Fiery Knock of Sydney test: सिडनी कसोटीत ऋषभ पंतची बॅट तळपली आणि पंतने ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर ऐतिहासिक अर्धशतकी खेळी केली. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या सामन्यात ऋषभ पंतने चमकदार कामगिरी केली. त्याने टी-२० शैलीत फलंदाजी करत केवळ २९ चेंडूत शानदार अर्धशतक झळकावले. पंतच्या झंझावाती अर्धशतकाने फक्त चाहतेच नाही तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही भारावून गेला. सचिनने खास पोस्ट करत ऋषभ पंतच्या खेळीबाबत काय म्हटलं आहे, जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिडनी कसोटीत भारतीय फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरलेल्या बोलँडच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावत ऑस्ट्रेलियाला धक्का दिला. यानंतर स्टार्कच्या षटकात सलग दोन षटकार लगावत आणि पदार्पणवीर ब्यू वेबस्टरची धुलाई करत ऑस्ट्रेलियाच्या नाकीनऊ आणले आणि भारताची धावसंख्या १०० पार नेली. ऋषभ पंतने बाद होण्यापूर्वी मैदानावर चौकार षटकारांचा पाऊस पाडला. त्याने ३३ चेंडूत ४ षटकार आणि ६ चौकारांसह ६१ धावांची वादळी खेळी केली.

हेही वाचा – IND vs AUS: ऋषभ पंतने वादळी अर्धशतकासह घडवला इतिहास, ऑस्ट्रेलियात ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज

ऋषभ पंतच्या झंझावाती खेळीनंतर सचिन तेंडुलकरही त्याच्या खेळीचे कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही. सचिनने एक्स-पोस्टवर पंतसाठी लिहिलं, “ज्या विकेटवर बहुतेक फलंदाजांनी ५० किंवा त्याहून कमी स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आहे, तिथे ऋषभ पंतची १८४ च्या स्ट्राइक रेटने केलेली खेळी खरोखरच उल्लेखनीय आहे. त्याने पहिल्याच चेंडूपासून ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणलं. त्याला फलंदाजी करताना पाहणं नेहमीच मनोरंजक असतं. प्रभावी खेळी.”

हेही वाचा – IND vs AUS: “ओए कॉन्टास, काय झालं रे..?” यशस्वी जैस्वालने कॉन्स्टासला चिडवलं, चुकीचं नाव घेत अशी घेतली फिरकी; VIDEO व्हायरल

सिडनी कसोटीच्या पहिल्या डावात ऋषभ पंतने भारताकडून सर्वाधिक ४० धावा केल्या. दुसऱ्या डावात त्याने अर्धशतक केले. प्रथम त्याने २९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतरही वेगवान खेळ सुरूच ठेवला पण ६१ धावांवर पंत पॅट कमिन्सच्या चेंडूवर ॲलेक्स कॅरीकरवी झेलबाद झाला.

हेही वाचा – IND vs AUS: जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत अपडेट, बुमराहला नेमकं काय झालं? का सोडलं मैदान? प्रसिध कृष्णाने दिली माहिती

सिडनी कसोटीत एक वेगळाच रोमांच अनुभवायला मिळत आहे. शेवटच्या कसोटीत टीम इंडियाचा पहिला डाव १८५ धावांवरच आटोपला होता. ऋषभने यात सर्वाधिक ४० धावा केल्या होत्या. स्कॉट बाउलँडने सर्वाधिक ४ विकेट घेतले. तर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १८१ धावांवर आटोपला. पदार्पण करणाऱ्या ब्यू वेबस्टरने ५७ धावांचे योगदान दिले. भारताकडून मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णाने प्रत्येकी तीन विकेट घेतले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने दुसऱ्या डावात ६ गडी गमावून १४१ धावा केल्या. पहिल्या डावातील चार धावांच्या आघाडीच्या आधारे भारताची एकूण आघाडी १४५ धावांची झाली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar praised rishabh pant fiery inning in sydney test said he has rattled australia from ball one ind vs aus bdg