Sachin Tendulkar praised Rohit-Bumrah: भारतीय संघाने विश्वचषकात दमदार सुरुवात केली आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि नंतर अफगाणिस्तानचा पराभव केला. दोन सामन्यांत दोन विजय मिळवून टीम इंडिया गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. भारताला आता आपला पुढचा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. अहमदाबादमध्ये होणाऱ्या या सामन्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहचे कौतुक केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुमराह-रोहितने जिंकून दिला सामना –

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहने चार विकेट घेतल्या, तर रोहित शर्माने १३१ धावांची शानदार खेळी केली. रोहितने आपल्या खेळीत ५ षटकार आणि १६ चौकार मारले होते. या खेळीच्या जोरावर भारताने अवघ्या ३५ षटकांत लक्ष्य गाठले. सचिन बुमराह आणि रोहित यांच्या कामगिरीने खूप प्रभावित दिसला. या कामगिरीवरून भारत पाकिस्तानचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे त्याला वाटते.

सचिन तेंडुलकरने रोहित-बुमराहचे केले कौतुक –

रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहचा फोटो शेअर करताना सचिनने एक्सवर लिहिले, ‘रोहित आणि बुमराहचे दोन उत्कृष्ट प्रदर्शन. त्याला फलंदाजी आणि गोलंदाजीची उत्तम साथ मिळाली. दोन सामन्यामध्ये आम्ही दोन खेळाडूंना खूप भिन्न भूमिका बजावताना पाहिले. १४ ऑक्टोबरसाठी तयारी जोरात सुरू असल्याचे वाटत आहे. आम्ही वाट पाहत आहोत.’

हेही वाचा – World Cup 2023, IND vs AFG: रोहित शर्माने मोडला सनथ जयसूर्याचा विक्रम, वनडेत सलामीवीर म्हणून झळकावले २९ वे शतक

रोहितने खेळपट्टीला दिले श्रेय –

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड झालेल्या रोहितने भारताच्या आठ विकेट्सने विजय मिळविल्यानंतर सांगितले की, “फलंदाजी करण्यासाठी ही चांगली खेळपट्टी होती. माझा नैसर्गिक खेळ खेळण्यासाठी मी स्वतःला आधार देत होतो. मला माहीत आहे की एकदा मी माझी नजर जमली केली की, विकेटवर फलंदाजी करणे सोपे होईल.”

सामन्याबद्दल बोलायचे, तर विश्वचषक २०२३ च्या दहाव्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. या विजयासह भारताने वर्ल्डकपमधील बॅक टू बॅक सामने जिंकले आहेत. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने वादळी खेळी केली. रोहितने केवळ ८४ चेंडूत १३१ धावांची खेळी केली आहे. याशिवाय विराट कोहलीनेही शानदार खेळी केली आहे. भारताने हा सामना ८ विकेट्सने जिंकला . तर अफगाणिस्तानला दोन्ही सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. या सामन्यात रोहितने अनेक विक्रम मोडीत काढले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar praises rohit sharma and jasprit bumrahs performance against afghanistan world cup 2023 vbm