भारतात ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन (Teachers’Day) साजरा केला जातो. या दिवशी शिष्य आपल्या गुरूंचे आभार मानतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. याच निमित्ताने भारताचा माजी खेळाडू ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर यानेही आपले गुरु दिवंगत रमाकांत आचरेकर यांचे आभार मानले असून त्यांच्या शिकवणीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून सचिनने आपल्या गुरुचे आभार मानले आहेत. दिवंगत रमाकांत आचरेकर यांनी दिलेले जीवनाचे धडे आयुष्यभर चांगली वर्तणुक करण्यासाठी प्रेरित करतात अशा भावना त्याने आपल्या ट्विटमधून व्यक्त केल्या आहेत.

केवळ क्रिकेटमधील स्ट्रेट ड्राईव्हच नव्हे, तर आयुष्यातदेखील कोणतीही लबाडी न करता सरळ मार्गाने कसे वागले पाहिजे हे मला आचरेकर सरांनी शिकवले असे सचिनने नमूद केले. “प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांनी क्रिकेटच्या मैदानात आणि आयुष्यात सरळमार्गी कसे वागायचे याची मला शिकवण दिली. शिक्षक केवळ शिक्षणच देत नाहीत, तर शिष्याला नितीमूल्यांचे शिक्षणही देत असतात. शिष्याच्या आयुष्यात गुरूंचे मोठे योगदान असते. आचरेकर सरांनी मला खूप काही शिकवले. आजही आचरेकर सरांनी दिलेले धडे मला मार्गदर्शन करत आहेत. त्यासाठी मी त्यांचा कायम ऋणी राहिन” असे ट्विट करत सचिन तेंडुलकरने आपल्या भावना व्यक्त केल्या आणि आचरेकर सरांचे मनापासून आभार मानले.

या आधी सचिन तेंडुलकरनो आचरेकर सरांबद्दल अनेक खास गोष्टी सांगितल्या आहेत. आचरेकर हे वेगळ्या पद्धतीचे शिक्षक होते, हे सचिनने अनेकदा सांगितले आहे. आचरेकर सर जितके कडक स्वभावाचे होते, तेवढेच प्रेमळही होते. परंतु, त्यांचा हा प्रेमळ स्वभाव केवळ मैदानाबाहेर पाहायला मिळला. मैदानात असताना त्यांना खेळाव्यतिरिक्त काहीही दिसायचे नाही आणि आमच्यापैकी कोणाचे खेळाकडे दुर्लक्ष झालेलेही त्यांनी अजिबात चालत नसे”, असे सचिनने अनेकदा कार्यक्रमांमध्ये सांगितले आहे. तसेच, त्यांच्या कडक शिस्तीमुळेच आम्ही घडलो असेही त्याने वेळोवेळी सांगितले आहे.

Story img Loader