MI vs RR Highlights IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 1000 व्या मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांची दणदणीत खेळी पाहायला मिळाली. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील वानखेडे सामन्याच्या पहिल्या भागात 124 धावांची विक्रमी खेळी करून यशस्वी जैस्वालने सगळ्यांना थक्क केले होते. पण म्हणतात ना खेळ कधीही बदलू शकतो. तसंच अगदी शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर सूर्यकुमार यादव आणि टीम डेव्हिड यांनी आरआरच्या नाकाखालून विजय चोरून नेला. डेव्हिडने मुंबई इंडियन्सला १७ धावांची गरज असताना षटकारांच्या हॅट्रिकसह विजय आपल्या संघाकडे खेचून आणला. डेव्हिडच्या या मिलियन डॉलर खेळावर सचिन तेंडुलकरने दिलेली प्रतिक्रिया सध्या व्हायरल होत आहे
मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार तेंडुलकर हा आता मार्गदर्शक म्हणून संघाचा भाग आहे. राजस्थानविरुद्ध मुंबईच्या डावादरम्यान सचिनच्या तीन प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहेत. इशान किशनकडून जेव्हा पॉवरप्लेमध्ये त्याचा एक शॉट स्लिप कॉर्डनच्या पुढे गेला होता तेव्हा सचिन तो निराश झालेला दिसत होता, तर दुसऱ्यांदा आठव्या षटकात, जेव्हा कॅमेरून ग्रीनने युझवेंद्र चहलच्या बॉलवर स्ट्रेट ड्राइव्हवर जबरदस्त षटकार ठोकला तेव्हाही सचिन नाराजच दिसला. तिसऱ्यांदा जेव्हा सचिनचा चेहरा कॅमेऱ्यात दिसला तेव्हा मात्र त्याच्या आनंदाला पारावार नव्हता.
२१३ धावांचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात डेव्हिडने वेस्ट इंडिजचा अष्टपैलू जेसन होल्डरविरुद्ध दुसरा षटकार मारला तेव्हा मुंबई इंडियन्सला विजयासाठी १५ धावांची गरज होती आणि डेव्हिड स्ट्राइकवर होता. होल्डरने वाइड फुल टॉस पहिला बॉल टाकताच डेव्हिडने तो स्वीप केला. त्यानंतर होल्डरने कमी वेगात फुल टॉस टाकताच डेव्हिडने मिड-विकेटवर षटकार ठोकला. त्या शॉटने सचिन पूर्णपणे चकित झाला होता व हीच प्रतिक्रया सध्या व्हायरल होत आहे.
Video: डेव्हिडच्या तिसऱ्या सिक्सवर तेंडुलकर फिदा
हे ही वाचा<< ७०० रुपये लिटर पाणी पिणाऱ्या विराट कोहलीने शिळ्या जेवणाचा धरला हट्ट; 5 स्टारचा शेफ म्हणाला, “BCCI ने कठोर..”
डेव्हिडच्या सलग तिसऱ्या षटकाराने एमआयला राजस्थानविरुद्ध विक्रमी धावसंख्या पूर्ण करण्यात मदत केली. सामन्यानंतर डेव्हिडने सांगितले की, संघाचा आत्मविश्वास वाढण्यासाठी ही उत्तम गोष्ट घडली आहे. प्रत्येक गोलंदाजाला लक्ष्य करावे लागेल असे वाटले पण परिस्थिती फलंदाजीला अनुकूल होती. शेवटच्या षटकात मी समोर येऊन डाऊन अँगल खेळण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या स्थानी फलंदाजी करताना प्रेशर होते. प्रत्येक वेळी जेव्हा कोणी यॉर्कर चुकवतो तेव्हा तुम्हाला असे वाटायचे की तुम्ही फलंदाज म्हणून चुकला आहात. “