गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ महाराष्ट्रातील स्थानिक टी-२० क्रिकेट स्पर्धा पुरंदर प्रीमियर लीग’मधील आहे. व्हिडिओमध्ये अंपायर हातांऐवजी पायांनी वाइडचा इशारा करताना दिसत आहेत. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनेही त्याच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये, अंपायर त्याच्या डोक्यावर उभा राहून पायाने वाइडचा इशारा देत आहे. अंपायरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सचिननेही त्याच्या ट्विटर अकाउंटवरून व्हिडिओ शेअर केला आहे आणि आंतरराष्ट्रीय पंच बिली बाऊडेन यांना टॅग करून त्यांचे मतही विचारले आहे.

बिली बाऊडेन हे त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत अनेकदा वेगळ्या हावभावाद्वारे अंपायरिंग करत. सचिनपूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनही महाराष्ट्राच्या या अंपायरवर आश्चर्यचकित झाला होता. त्याने हा व्हायरल व्हिडिओ शेअर केला. नक्कीच आम्हाला या माणसाला आससीसीच्या एलिट पॅनेलमध्ये सामील होताना पाहायचे आहे, असे कॅप्शन वॉनने या व्हिडिओला दिले होते.

हेही वाचा – अरे बापरे..! आफ्रिका दौऱ्यापूर्वी विराटनं घेतला ‘मोठा’ निर्णय; आधी रोहित मालिकेबाहेर झाला आणि आता…

क्रिकेटमध्ये अंपायरिंग हे खरोखरच एक कठीण काम आहे, कारण मैदानावरील पंचांना काही सेकंदात काही महत्त्वपूर्ण कॉल घेणे आवश्यक असते. पायचीतचे निर्णय आणि इतर निर्णय अचूकपणे दिले जाणे आवश्यक आहे, कारण एक चुकीचा कॉल संपूर्ण खेळावर परिणाम करू शकतो. विशेष म्हणजे, अंपायर सामान्यत: प्रकाशझोतात येतात, जेव्हा ते निर्णय घेताना चुका करतात. यावरून अंपायरिंगचे काम किती अवघड असते हे लक्षात येते. मात्र महाराष्ट्रातील हा अंपायर आपल्या आगळ्यावेगळ्या कौशल्यामुळे प्रकाशझोतात आला आहे.

Story img Loader