Sachin Tendulkar remembered Shane Warne: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज लेगस्पिनर शेन वॉर्नच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. आजच्या दिवशी ऑस्ट्रेलियासह जागतिक क्रिकेटसाठी एक दु:खद बातमी समोर आली होती. माजी महान लेगस्पिनर शेन वॉर्नचे गेल्या वर्षी ४ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शेन वॉर्न अवघ्या ५२ वर्षांचा होता. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्व खेळाडू त्यांची आठवण काढत आहेत.मात्र त्यांचा प्रतिस्पर्धी आणि खास मित्र, टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याने त्यांची आठवण काढताना एक भावनिक संदेश सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आम्ही संस्मरणीय सामने खेळलो –
शेन वॉर्नचे स्मरण करताना सचिन तेंडुलकरने लिहिले की, ‘आम्ही मैदानावर काही संस्मरणीय सामने खेळले आहेत आणि त्यानंतर तितकेच संस्मरणीय क्षण शेअर केले आहेत. मला तुमची आठवण फक्त एक महान क्रिकेटर म्हणून नाही,तर एक चांगला मित्र म्हणूनही आहे. मला खात्री आहे की तू तुझ्या विनोदबुद्धीने आणि करिष्माने स्वर्गाला पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक स्थान बनवत आहेस, वॉर्नी!” दोन्ही दिग्गज क्रिकेटपटू निवृत्तीनंतरही अनेकदा एकमेकांना भेटत असत.
राजस्थान रॉयल्सलाही झाली आठवण –
शेन वॉर्नचा जलवा आयपीएलमध्येही पाहायला मिळाला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सने पहिले विजेतेपद पटकावले. राजस्थान रॉयल्सनेही ट्विट करून त्याची आठवण काढली आहे. याशिवाय अॅडम गिलख्रिस्ट, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन, शेन वॉटसन यांच्यासह अनेक माजी खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन दिग्गजांची आठवण काढली. प्रत्येकाने आपल्या त्याच्यासोबतच्या आठवणी शेअर केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने याच दिवशी जगाचा निरोप घेतला होता. थायलंडमधील कोह सामुई येथे २०२२ मध्ये त्यांचे निधन झाले. त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या दिग्गज क्रिकेटपटूच्या अचानक जाण्याने क्रिकेट विश्वाला आणि लोकांना धक्का बसला होता.
क्रिकेट इतिहासातील दिग्गज फिरकीपटू –
क्रिकेटच्या इतिहासातील दिग्गज फिरकीपटूंमध्ये शेन वॉर्नची गणना केली जाते. मुथय्या मुरलीधरननंतर कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम शेन वॉर्नच्या नावावर आहे. त्याने १४५ कसोटी सामन्यात ७०८ बळी घेतले आहेत. त्याने १९४ वनडेत २९३ विकेट घेतल्या आहेत. शेन वॉर्नची कारकीर्द जितकी चमकदार होती तितकीच त्याचे आयुष्यही वादग्रस्त होते. अशा परिस्थितीत तो नेहमीच चर्चेत राहिला.